प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

जळगावमध्ये तीन लाख ग्राहकांकडे ५३७ कोटींची थकबाकी; वीजपुरवठा होणार खंडित! महावितरणकडून वीजबिल वसुली मोहीम सुरू

वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने सुरू केली आहे. जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक ग्राहकांकडे ५३७ कोटी रुपयांचे वीजबिल थकित आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Swapnil S

जळगाव : वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने सुरू केली आहे. जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक ग्राहकांकडे ५३७ कोटी रुपयांचे वीजबिल थकित आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील एकूण ३ लाख १६ हजार ६८१ ग्राहकांकडे ५३७कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती वर्गवारीतील २ लाख ८५ हजार ६०७ ग्राहकांकडे ६९ कोटी ५५ लाख, व्यावसायिक वर्गवारीतील १९ हजार ३२४ ग्राहकांकडे ११ कोटी ४१ लाख, औद्योगिक वर्गवारीतील २ हजार ८४२ ग्राहकांकडे ७ कोटी ४० लाख, पथदिवे वर्गवारीतील २८२३ ग्राहकांकडे १७४ कोटी ८३ लाख, सार्वजनिक पाणीपुरवठा वर्गवारीतील २३७९ ग्राहकांकडे २६८ कोटी ८४ लाख, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील ३७०६ ग्राहकांकडे ५ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी आहे.

विभागनिहाय विचार करता भुसावळ विभागात ७१ कोटी ३७ लाख, चाळीसगाव विभागात ३८ कोटी ४८ लाख, धरणगाव विभागात १२३ कोटी ६८ लाख, जळगाव विभागात ४७ कोटी १० लाख, मुक्ताईनगर विभागात ४२ कोटी ३७ लाख, पाचोरा विभागात ५८ कोटी ६२ लाख व सावदा विभागात १५५ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र महावितरणतर्फे धडक वीजबिल वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.

सुट्टीच्या दिवशीही मोहीम सुरू

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते व तांत्रिक कर्मचारी या मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुलीसाठी सरसावले आहेत. तसेच थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही कुणी ग्राहक अनधिकृतरीत्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू आहे.

महावितरणचे आवाहन

अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत. तर जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करण्याची कारवाई या मोहिमेत करण्यात येत आहे. महावितरणने आपले वीज कनेक्शन तोडण्याची वाट न पाहता ग्राहकांनी चालू महिन्याच्या वीजबिलासह थकबाकीची रक्कम विनाविलंब भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

१ पपिलाए सून आजपर्यंत २६१६, चाळीसगाव विभागातील ११०७, धरणगाव विभागातील २६०१, जळगाव विभागातील १३२३, मुक्ताईनगर विभागातील ९२४, पाचोरा विभागातील २४०५ व सावदा विभागातील ९५५ अशा जळगाव जिल्ह्यातील एकूण ११ हजार ९३१ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिले भरून सहकार्य करावे व संभाव्य गैरसोय टाळावी.
आय. ए. मुलाणी, मुख्य अभियंता, जळगाव परिमंडळ महावितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दुराव्यावर एकनाथ शिंदेंनी सोडलं मौन; "तुम्ही सगळे फक्त ब्रेकिंग न्यूजसाठी...

गौरी गर्जे प्रकरण : आत्महत्या की हत्या? प्रेयसी गरोदर, अफेअर लपवण्यासाठी ब्लॅकमेलिंग; कुटुंबियांचे अनंत गर्जेवर गंभीर आरोप

१० महिन्यांचा संसार, नवऱ्याचे अनैतिक संबंध, शेवटी टोकाचं पाऊल; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

चोरीच्या संशयावरून १४ वर्षाच्या मुलासोबत राक्षसी कृत्य; लोखंडी बैलगाडीला बांधलं, खालून आग लावली, धुळ्यातील संतापजनक घटना

पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रास्त्र रॅकेटचा पर्दाफाश, ३६ जण ताब्यात