प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

जळगावमध्ये भाजप/ शिंदे गटात खरी लढत; १८ नगरपालिका-नगरपंचायतींची मंगळवारी निवडणूक

जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपालिका आणि २ नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. २ डिसेंबर) मतदान होणार असून ४६४ जागांसाठी तब्बल १५५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रचाराला शिग आली असून जिल्हाभरात खरी लढत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.जिल्ह्यात नगराध्यक्ष पदांसाठी थेट निवडणूक असल्याने अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या आहेत.

विजय पाठक

जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपालिका आणि २ नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. २ डिसेंबर) मतदान होणार असून ४६४ जागांसाठी तब्बल १५५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रचाराला शिग आली असून जिल्हाभरात खरी लढत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.जिल्ह्यात नगराध्यक्ष पदांसाठी थेट निवडणूक असल्याने अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या आहेत.

जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व क्षीण असल्याचे दिसत असून अनेक ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी त्यांनी उमेदवार दिला नाही. जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, मुक्ताईनगर, पाचोरा, फैजपूर, नशिराबाद, भडगाव, वरणगाव, सावदा या नऊ नगरपालिकांमध्ये सरळ लढती होत आहेत. मुक्ताईनगरमध्ये उमेदवार न देण्याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची स्थानिक ताकद नसल्याचे नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने सर्वतोपरी शक्तीनिशी प्रचार केल्याचे दिसून येत आहे. २ डिसेंबरच्या मतदानातून जिल्ह्याचा राजकीय प्रवाह कोणत्या दिशेने वळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चार प्रतिष्ठेच्या नगराध्यक्षपदांच्या लढती चर्चेत

  • जामनेर : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचा माघार घेतल्याने ही जागा बिनविरोध निवडून आली आहे.

  • पाचोरा : जिल्हाभराचे लक्ष वेधून घेणाऱ्या या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे आ. किशोर पाटील व भाजप उमेदवार, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांच्यात थेट सामना.

  • चाळीसगाव : भाजपचे आ. मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण विरुद्ध शहर विकास आघाडीच्या पदमजा देशमुख अशी लढत

  • भुसावळ : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे भाजपतर्फे तर शहर विकास आघाडीकडून त्यांच्याविरोधात उमेदवार.

पक्षनिहाय उमेदवारीचे चित्र

नगराध्यक्षपदांसाठी पक्षनिहाय उमेदवार

प्रमुख नेत्यांच्या सभा

तिरंगी आणि बहुकोनी लढती

  • चोपडा : भाजप-काँग्रेस युती विरुद्ध शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट असा तिरंगी सामना.

  • मुक्ताईनगर : एकनाथ खडसे यांच्या प्रभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने उमेदवार दिला नाही.

  • भडगाव : अजित पवार गट -भाजप- शिवसेना शिंदे गट अशी तिरंगी टक्कर.

शाळा/आठवडे बाजार बंद

जळगाव : राज्य निवडणूक आयोगाच्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपरिषद व २ नगरपंचायत क्षेत्रात २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि कायदा -सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मतदान केंद्रे म्हणून अधिग्रहित सर्व शाळांना १ व २ डिसेंबर रोजी प्रशासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

१ डिसेंबरला मतदान अधिकारी व कर्मचारी पूर्वतयारीसाठी केंद्रांवर दाखल होणार असल्याने ही सुट्टी देण्यात आली आहे. तसेच २ डिसेंबर रोजी मतदारांना भरपगारी सुट्टी देणे अनिवार्य आहे. अत्यावश्यक व अविरत सेवा क्षेत्रात सुट्टी देणे शक्य नसल्यास संबंधितांनी २ ते ३ तासांची विशेष सवलत देऊन मतदानाचा हक्क बजावण्याची संधी कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.मतदानासाठी सुट्टी/सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सुट्टी लागू असलेली क्षेत्रे

  • १६ नगरपरिषद : भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, सावदा, रावेर, यावल, वरणगाव, नशिराबाद

  • २ नगरपंचायती : मुक्ताईनगर, शेंदुर्णी

  • मतदान प्रक्रिया क्षेत्र : जामनेर, अमळनेर, भुसावळ, भडगाव, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदुर्णी, वरणगाव, यावल

निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आणि प्रक्रिया सुशासनाधारित पार पाडण्यासाठी शाळा दोन दिवस बंद राहतील. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी, तसेच कायदा-सुव्यवस्था भक्कम ठेवण्यासाठी २ आणि ३ डिसेंबर रोजी सर्व नगरपरिषद/नगरपंचायत हद्दींतील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी हे बाजार पर्यायी दिवशी भरविण्याचे निर्देश
रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव

Mumbai : ‘एआय’च्या मदतीने बनावट पासचे आणखी एक प्रकरण; तीन जणांवर गुन्हा दाखल, एसी लोकलमधून करत होते प्रवास

राज्यातील शिक्षकांना मिळणार सकारात्मक शिस्तीचे धडे; शिक्षण विभागाचे महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबईत पुन्हा हाय अलर्ट! २ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी; २५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम