Murud : काशीद बीचवर जळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Murud : काशीद बीचवर जळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू

मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद बीचवर बुधवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत जळगाव जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर दुसऱ्या तरुणाचे प्राण लाइफगार्ड आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले.

Swapnil S

मुरूड-जंजिरा : मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद बीचवर बुधवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत जळगाव जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर दुसऱ्या तरुणाचे प्राण लाइफगार्ड आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, अमीन मजीद खान (२५), मलिक नजीर शेख (२१) आणि इम्रान अन्वर खान (३७) हे ताडपत्री विक्रीच्या व्यवसायानिमित्त काशीद-मुरूड परिसरात आले होते. व्यवसायाच्या कामातून वेळ मिळाल्यानंतर ते काशीद बीचवर फिरण्यासाठी गेले होते.

यावेळी अमीन खान आणि मलिक शेख हे समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा आणि भरतीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात वाहून गेले. ही बाब लक्षात येताच तेथील लाइफगार्ड आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.

UPI तिकीट, पास खरेदीवर प्रवाशांना भुर्दंड; ५.९० रुपये अधिक मोजावे लागणार

समृद्धी ते पुणे ६ तासांच्या पाठलागाचा थरार; १.१३ कोटींचा गुटखा जप्त

Mumbai : आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; 'मातोश्री' बाहेर हायव्होल्टेज ड्रामा

१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन

Mumbai : मेट्रोच्या कामादरम्यान दुचाकीवर बॅरिकेड कोसळले; विक्रोळीत प्लंबरचा मृत्यू