महाराष्ट्र

जलील यांनी सुभाष देसाई यांच्यावर 120 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा केला आरोप

खा. इम्तियाज जलिल यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व निराधार असल्याचे स्पष्टीकरण माजी उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिले

प्रतिनिधी

माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लँड कन्वर्जनच्या नावाखाली औरंगाबादमध्ये ५२ प्लॉट रूपांतरित करत १२० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी केला आहे. बुधवारी सुभेदारी विश्रामगृहवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी देसाई यांच्या मुलावरही गंभीर स्वरूपाचे आरोप केले.

चिकलठाणा इंडस्ट्रियल भागात ५२ प्लॉटचा वापर बदलण्यात आला आहे, यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा खा. इम्तियाज जलील यांचा आरोप आहे. राज्यात आत्तापर्यंत ३२ हजार एकर जमिनीचे गेल्या पंधरा वर्षांत इंडस्ट्रियल कन्वर्जन झाले असल्याचा दावा जलील यांनी केला. या प्रकरणात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच नारायण राणे यांची देखील चौकशी करण्याची मागणी जलील यांनी केली. याप्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी केली तर सुभाष देसाई तुरुंगात जातील, असेही जलील म्हणाले.

सुभाष देसाई यांच्यासह त्यांच्या मुलावर देखील खा. जलील यांनी गंभीर आरोप केले. या सर्व प्रकरणात देसाई यांच्या मुलाचा सहभाग होता. देसाई यांचा मुलगा संबंधित बिल्डरांशी संपर्क साधून रेट ठरवित होता. हा सर्व घोटाळा तब्बल एक हजार कोटीच्या घरात असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांचे म्हणणे आहे.

जलील यांचे आरोप बिनबुडाचे- सुभाष देसाई

खा. इम्तियाज जलिल यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व निराधार असल्याचे स्पष्टीकरण माजी उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिले आहे. 'माझ्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करताना त्यांनी कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावे दिले नाहीत. माझ्या चारित्र्यावर अशा रीतीने शिंतोडे उडविण्याचाच हा प्रयत्न आहे. खा. इम्तियाज जलिल यांनी हे निराधार आरोप त्वरित मागे घेऊन माझी माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा व नुकसानभरपाईचा खटला दाखल करण्यात येईल,' असे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव