महाराष्ट्र

राष्ट्रवादीची आजपासून ‘जन सन्मान यात्रा’,नाशिक जिल्ह्यात आज आयोजन

Swapnil S

मुंबई : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनसन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची 'जन सन्मान यात्रा' नाशिक जिल्ह्यात आज (रविवार) व सोमवारी आयोजित केल्याची माहिती प्रदेश कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी दिली. मंत्रालयासमोरील ‘राजगड’ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, २८ जुलै रोजी सकाळी ११ ते १२ नाशिक जिल्हा कार्यकारिणी व फ्रंटच्या प्रमुखांची बैठक, १२.३० ते १.३० वाजता देवळाली येथे आमदार सरोज अहिरे व विधानसभा समन्वयकांसोबत बैठक, दुपारी २.३० ते ३.३० वाजता सिन्नर येथे आमदार माणिकराव कोकाटे व विधानसभा समन्वयकांसोबत बैठक, सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजता अहिल्यानगर-कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे व विधानसभा समन्वयकांसोबत बैठक, सायंकाळी ६ ते ८ येवला येथे मंत्री छगन भुजबळ व विधानसभा समन्वयकांसोबत बैठक, तर सोमवार, २९ जुलै रोजी सकाळी १० ते ११ वाजता निफाड येथे आमदार दिलीप बनकर व समन्वयकांसोबत बैठक, दुपारी १२.३० ते १.३० वाजता विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ व समन्वयकांसोबत बैठक होणार आहे.

या जनसन्मान यात्रेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासमवेत महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, तसेच ओबीसी सेल, अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सहभागी होणार असल्याची माहितीही आमदार गर्जे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत