PM
महाराष्ट्र

सिंधुदुर्गात जेएन-१ चा रुग्ण ;मुंबईत खबरदारीचे आवाहन

Swapnil S

मुंबई : देशात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा उपप्रकार जेएन व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. देशात केरळमध्ये जेएन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात जेएन व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. दरम्यान, जेएन व्हेरियंट मुंबईत आढळला नसला तरी काळजी व खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

ठाण्यात कोविडच्या उप-प्रकारातील जेएन-१ या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर बुधवारी दुसरा रुग्ण सिंधुदूर्ग जिल्ह्यात आढळला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ४१ वर्षीय पुरुषाला या नव्या उप प्रकाराचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व इतर कोविड योग्य वर्तन गरजेचे असल्याची सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, नागपूर येथे नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बैठक घेऊन सूचना जारी केल्या. या व्हेरियंटची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कोविड जेएन.१ च्या नवीन उप-प्रकाराबाबत केंद्र सरकार सतर्क झाले असून केंद्राने राज्यांना पत्र लिहून संशयितांवर लक्ष ठेवावे, त्यांची चौकशी करावी आणि जिनोम सिक्वेन्सिंगसाठी निदान केलेले नमुने पाठवावेत असे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, शहरातील तज्ञांनी मुंबईकरांना सतर्क राहण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस