महाराष्ट्र

कास पठार 'पुष्पदर्शन' हंगामाचा फुटला नारळ; पर्यटकांसाठी मोफत बस सेवा, प्रवेश शुल्क किती?

जागतिक वारसा स्थळ असलेल्या (वर्ल्ड हेरिटेज) साताऱ्याजवळील कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामाचा नारळ फुटला असून उद्घाटन सातारा जिल्हा उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांच्या हस्ते संपन्न झाले.

Swapnil S

कराड : जागतिक वारसा स्थळ असलेल्या (वर्ल्ड हेरिटेज) साताऱ्याजवळील कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामाचा नारळ फुटला असून उद्घाटन सातारा जिल्हा उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास सहायक वनसंरक्षक प्रदीप रौधाळ, तहसीलदार हनुमंत कोळेकर, नायब तहसीलदार संजय बैलकर, सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, जावली वनक्षेत्रपाल हणमंत गमरे, वनपाल राजाराम काशिद कास समितीचे अध्यक्ष दत्ता किर्दत, उपाध्यक्ष प्रदिप कदम, समितीचे सदस्य सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर आखाडे, विठ्ठल कदम, रामचंद्र उंबरकर, विजय वेंदे, विकास किर्दत आदी मान्यवर उपस्थित होते.

कास पठार वन कार्यकारी समितीकडून पर्यटकांसाठीच्या सर्व सोयी सुविधांची तयारी करण्यात आली असून यावर्षी प्रथमच पर्यटकांकरिता पाऊस आणि उन्हापासून संरक्षणासाठी नैसर्गिकरित्या सहा निवारा शेड तयार करण्यात आली आहेत.

पर्यटकांसाठी मोफत बस सेवा

ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना ऑनलाइनची सुविधा www.kas.ind.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क १५० रुपये,गाईड फी शंभर रुपये (प्रति ग्रुप १० पर्यटक संख्या),उपद्रव शुल्क दोन हजार रुपये, बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना ४० रुपये प्रवेश शुल्क मात्र सोमवार ते शुक्रवार येणे बंधनकारक असेल तसेच संबंधित शाळा कॉलेज महाविद्यालय यांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांचे पत्र आवश्यक असेल. हंगामा करिता सहा गावातील १३० हंगामी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पार्किंग ते कास पुष्प पठार यादरम्यान पर्यटकांसाठी मोफत बस सेवा पुरविली जाणार आहे. तसेच पार्किंगमध्ये सहा शौचालयांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.

"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Telegram ला केंद्र सरकारची नोटीस; बेकायदेशीर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर कारवाईचे निर्देश

Mumbai Rain : पावसाचा जोर कायम; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video

जोगेश्वरीत भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; पळ काढणाऱ्या चालकाला नागरिकांनी केलं पोलिसांच्या हवाली, Video