'बो माऊथ गिटार' माशाची शिकार 
महाराष्ट्र

Karad : 'बो माऊथ गिटार' माशाची शिकार; दोघांवर गुन्हा दाखल

वन्यजीव संरक्षण कायदा शेड्युल–१ (भाग ई) मध्ये समाविष्ट असलेला तसेच आय.यू.सी.एन.कडून अत्यंत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेला आणि रेड डाटा लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या ‘बो माऊथ गिटार’ (Bowmouth Guitar Fish) या दुर्मिळ माशाची कराड परिसरात शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Swapnil S

कराड : वन्यजीव संरक्षण कायदा शेड्युल–१ (भाग ई) मध्ये समाविष्ट असलेला तसेच आय.यू.सी.एन.कडून अत्यंत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेला आणि रेड डाटा लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या ‘बो माऊथ गिटार’ (Bowmouth Guitar Fish) या दुर्मिळ माशाची कराड परिसरात शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणात कराड येथील अमीर दस्तगीर नदाफ (रा. मलकापूर, कराड) व सातारा येथील ओमकार राजेंद्र मिळवणे (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी सदर माशाचा व्हिडीओ प्रसारित करून त्याचे प्रदर्शन केल्याची माहिती वन विभागाला गुप्त माहितीद्वारे मिळाली. त्यानंतर वन विभागाने तात्काळ कारवाई करत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई साताऱ्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, वनपाल आनंद जगताप, वनपाल सुनील शिंदे, वनरक्षक कैलास सानप, अभिजीत शेळके, अक्षय पाटील व मुकेश राऊळकर यांचा समावेश होता.

या प्रकरणाचा पुढील तपास वन विभागाकडून सुरू असून, दुर्मिळ व संरक्षित प्रजातींच्या शिकारीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वन विभागाने दिला आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग