PM
महाराष्ट्र

कराड-चिपळूण मार्ग धोक्यात? ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे पुलाचे काम अर्धवट; प्रशासनाचे दुर्लक्ष?

कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील दुरवस्था आणि ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील वाहतुकीचा संपर्क पुन्हा तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील महिन्यात पहिल्याच पावसात पुलांचे काम अर्धवट ठेवण्यात आले होते, परिणामी हजारो प्रवाशांना महामार्गावरच अडकावे लागले होते.

Swapnil S

शेखर धोंगडे / कोल्हापूर

कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील दुरवस्था आणि ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील वाहतुकीचा संपर्क पुन्हा तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील महिन्यात पहिल्याच पावसात पुलांचे काम अर्धवट ठेवण्यात आले होते, परिणामी हजारो प्रवाशांना महामार्गावरच अडकावे लागले होते.

ठेकेदाराने कराड-चिपळूण मार्गावरील १३ किलोमीटर अंतरात अनेक पूल उघडे ठेवले होते. त्यांच्या बाजूला तयार केलेले पर्यायी रस्ते पावसात वाहून गेले. यामुळे निर्मित पुलांवर तात्पुरता भराव टाकून केवळ चारचाकी वाहने सोडली गेली, तर अवजड वाहनांना आठवडाभर रस्त्यावरच थांबावे लागले. एसटी बस सेवा (लालपरी) तब्बल १५ दिवस बंद राहिली.

ठेकेदारांच्या ‘ओल्या संबंधांमुळे’ त्यांच्या नियमबाह्य वाहनांना मार्ग मोकळा मिळतो, तर इतरांना कडक अटी लागू केल्या जातात. कराड प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) ठेकेदारांकडे दुर्लक्ष आणि अन्य वाहनचालकांवर कडक कारवाई करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरल्यामुळे पुलाच्या तात्पुरत्या दुरुस्तीवर फटका बसण्याची शक्यता आहे. ओढ्याचा प्रवाह वाढल्यास पूल वाहून जाण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

मुळात अशा आपत्तीजन्य परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने आरटीओ विभागाला सतर्कतेचा इशारा द्यायला हवा होता, मात्र तो न दिल्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. वाहतूक संघटनांनी आरटीओच्या ‘हप्तेबाजी’चा आरोप करत खुली पोलखोल सुरू केली आहे.

प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी! चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

भारतावर 'टॅरिफ' विघ्न! अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के 'टॅरिफ' लागू; भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; गणेश मंडळांसाठी शिवसेनेची रणनीती

आता दररोज १३ तास काम! वाढीव तास काम करण्यास मुभा; महिलांना रात्रीच्या शिफ्टसाठी परवानगी