Karjat : रूळ ओलांडताना एक्स्प्रेसची धडक; प्रवाशाचा मृत्यू, कर्जत रेल्वे पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Karjat : रूळ ओलांडताना एक्स्प्रेसची धडक; प्रवाशाचा मृत्यू, कर्जत रेल्वे पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

कर्जत-खोपोली रेल्वे स्थानकाजवळ मार्गावरील पळसदरी रेल्वे रूळ ओलांडताना मेल एक्स्प्रेसची धडक बसल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला.

Swapnil S

कर्जत : कर्जत-खोपोली रेल्वे स्थानकाजवळ मार्गावरील पळसदरी रेल्वे रूळ ओलांडताना मेल एक्स्प्रेसची धडक बसल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत प्रवाशाचे नाव सखाराम मारुती हिलम असे असून ते वासरे खोंडा परिसरातील शिरसे येथील आदिवासी वाडीतील रहिवासी होते. ते नेहमीप्रमाणे पळसदरी रेल्वे स्थानकावरून लोकलने खोपोली येथे नोकरीसाठी जात होते. खोपोलीकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी ते रेल्वे रूळ ओलांडत असताना पुण्याकडून येणाऱ्या मेल एक्स्प्रेसची त्यांना धडक बसली.

ही दुर्घटना पळसदरी प्लॅटफॉर्मपासून सुमारे २०० मीटर अंतरावर घडली. धडकेनंतर हिलम गंभीर जखमी अवस्थेत रेल्वे रुळाजवळ पडले होते. घटनेची माहिती मिळताच कर्जत रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिलासा; कलिना भूखंड घोटाळा प्रकरणातून दोषमुक्त

Mumbai : बाप्पा निघाले गावाला; नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्थळी BMC ची जय्यत तयारी

दुष्काळाच्या चर्चेसाठी अधिवेशन बोलवा! उद्धव ठाकरे यांची मागणी

Mumbai : साहील वाकोडे मृत्यूप्रकरणी पालकांचे आझाद मैदानावर उपोषण; राहुल गांधींचा वाकोडे कुटुंबाला फोन, आंदोलनाला दिला पाठिंबा

५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक खर्च; एकट्या बंगालमध्ये खर्च केले २८६.९९ कोटी रुपये, खर्च विवरणपत्रावरून माहिती उघड