महाराष्ट्र

केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही सुखरूप वाचलो! कराड तालुक्यातील हेळगावचे १७ पर्यटक सुखरूप

काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम येथील बैसरण घाटी परिसरात लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर मंगळवारी भ्याड हल्ला केला.

Swapnil S

कराड : काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम येथील बैसरण घाटी परिसरात लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर मंगळवारी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याच्या घटनेपासून केवळ एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सातारा जिल्ह्यातील सुमारे १७ पर्यटक सुखरूप असल्याचे थेट काश्मीरमधून कराड तालुक्यातील हेळगाव येथील भरत सूर्यवंशी आणि अमोल पवार यांनी दूरध्वनीवरून सांगितले. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जण मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये मूळचे सातारा जिल्ह्यातील बुधवारी ता खटाव येथील संतोष एकनाथ जगदाळे यांचाही समावेश आहे.

दरम्यान, त्या घटनेचा चित्त थरारक अनुभव डोळ्यांतील आसवे आवरत व दाटल्या गळ्याने सांगितला आणि केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही बचावलो, मात्र पर्यटकावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. याबाबत माहिती सांगताना भरत सूर्यवंशी म्हणाले, मंगळवारी आम्ही पेहलगाममधील ज्या ठिकाणी हल्ला झाला ती बैसरण घाटी बघून अर्ध्या तासानंतर, वेरू व्हॅली बघितली नंतर चंदनवरी व्हॅली पहात होतो तेव्हा आम्हाला समजले इथे जवळच वरती आतंकवादी हमला झाला. तो आमच्यापासून केवळ २ किलोमीटर अंतरावरती झाला.

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

कूपर रुग्णालयात 'फायर सेफ्टी बॉल' बसवणार; आग प्रतिबंधक तयारी अधिक मजबूत होणार

छठ पूजेमुळे 3 हजार कोटींची उलाढाल; BMC सज्ज

उलवेमध्ये घर खरेदीदारांची फसवणूक प्रकरण : विकासक गोराडिया दाम्पत्याला जामीन मंजूर

स्लीपर बसमधून प्रवास करताय हे लक्षात ठेवा; एसटीची सुरक्षा जनजागृती मोहीम सुरु