महाराष्ट्र

केरळ सरकारच्या 'या' निर्णयाचे सर्वत्र स्वागत, महाराष्ट्रातही हा निर्णय लागू करावा - जितेंद्र आव्हाड

आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मेन्शन देखील केले आहे

प्रतिनिधी

केरळमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यान सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केरळचे उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू यांनी जाहीर केला. मंत्री बिंदू यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे या निर्णयाची माहिती दिली. केरळ सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून महाराष्ट्रातही हा निर्णय लागू करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मेन्शन देखील केले आहे.

कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या SFIच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी संघटनेने मासिक पाळीच्या सुट्टीसाठी मोहीम राबविली. त्यानंतर तेथील सरकारने मासिक पाळीबाबत निर्णय घेतला. विद्यार्थी आणि नोकरदार महिलांना मासिक पाळीच्या रजेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. देशभरातील शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांना मासिक पाळीच्या सुट्या देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेवर निर्णय येण्यापूर्वीच केरळ सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मासिक पाळीच्या सुट्टीची घोषणा केली आहे. यापूर्वी बिहार सरकारनेही मासिक पाळीच्या सुट्टीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय घ्यावा, अशी मागणी जितेंद्र आवाड यांनी केली आहे.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल

१ ऑगस्टपासून ‘ईएलआय’ लागू होणार; दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणार; योजनेला केंद्र सरकारची मंजुरी