महाराष्ट्र

तेव्हा सोडले नसते तर आता आतमध्ये असते; खडसेंची महाजनांवर सडकून टीका

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजान यांच्यातील वाद नवा नाही. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आता एकनाथ खडसे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. तसेच सत्ताधारी पक्ष कशाप्रकारे यंत्रणांचा गैरवार करुन दबाव निर्णाण करतो, याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

गिरीश महाजनांनी माझ्यामागे सर्व यंत्रणा लावल्या, ईडी, सीबीआय चौकशी सुरु केली आणि माझ्यामागे मोक्का का लावला म्हणून मला विचारतो. तु माझ्यामागे ईडी लावली म्हणून मी तुझ्यामागे मोक्का लावला, असे विधान एकनाथ खडसे यांनी केले आहे. खडसेंच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सरकार विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते, यंत्रणांवर दबाब आणला जातो, असा आरोप यावेळी खडसे यांनी केला. त्यांनी गिरीश महाजन यांचा एकेरी उल्लेख करत गिरीशने माझ्यामागे सर्व यंत्रणा लावल्या, सत्तेत असताना एवढा माज येणे बरे नाही. हा माज फार काळ टिकत नाही, असे खडेबोल त्यांनी महाजन यांना सुनावले. यावेळी बोलताना त्यांनी न्यायालयाने आपल्याला मालमत्ता जप्तीची नोटीस दिली असल्याचेही सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी गिरीश महाजन यांना आम्हीच मोठे केले हे अख्या जामनेर तालुक्याला माहिती आहे. एक चांगल्या शिक्षकाचा पोरगा म्हणून त्यांना वर आणण्याचा प्रयत्न केला. नाहीतर ते वडिलांच्या पेन्शवर जगले असते, अशी बोचरी टीका देखील त्यांनी महाजनांवर केली.

फर्दापूरच्या एका प्रकरणात मी आलो म्हणून गिरीश महाजन वाचले, नाहीतर त्यावेळी महाजन आणि ती महिला कोणत्या अवस्थेत होते, हे मी पाहीले होते. असे म्हणत पोलिस निरिक्षकाने महाजन यांच्या कानाखाली वाजवली असल्याचे त्यांनी सांगितले. माझीच मोठी चूक झाल्याचे सांगत त्यावेळी सोडले नसते तर आज आतमध्ये असते, असे देखील खडसे म्हणाले आहेत. खडसे यांनी केलेल्या विधाणांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया