प्रातिनिधिक छायाचित्र 
महाराष्ट्र

कोल्हापूर : दाजीपूर ते राधानगरी मार्ग वाहतुकीस बंद

देवगड जिल्हा हद्द ते दाजीपूर राधानगरी मुदाळतिट्टा- निढोरी-निपाणी कलादगी रस्त्याचे दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे दिनांक १० मार्च ते ३० एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.

Swapnil S

कोल्हापूर : देवगड जिल्हा हद्द ते दाजीपूर राधानगरी मुदाळतिट्टा- निढोरी-निपाणी कलादगी रस्त्याचे दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे दिनांक १० मार्च ते ३० एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले आहे.

दाजीपूर ते राधानगरी मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. दाजीपूर ते राधानगरी रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करून हलक्या व लहान वाहनांकरीता बालिंगा- महे पाटी- कोते- धामोड- शिरगाव- तारळे- पडळी- कारीवडे- दाजीपूर रस्ता प्रजिमा २९ चा वापर करावा. तसेच अवजड व मोठी वाहतूक या रस्त्यावरून पूर्णपणे बंद करून कोकणातून कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा- नांदगाव- तळेरे- वैभववाडी- गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात यावी. तसेच कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता आंबोली अशी वाहतूक वळविण्यात यावी, असेही या अधिसुचनेव्दारे कळविण्यात आले आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Tirupati Blast : फार्मा कंपनीत मोठी दुर्घटना! बॉयलरच्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी; बचावकार्य सुरू, VIDEO

CNG Car Blast : गॅस भरतानाच कारचा भीषण स्फोट; थरकाप उडवणारा VIDEO, वाहनचालकांनो 'या' चुका टाळा, नाहीतर...

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय