महाराष्ट्र

कोयना धरण ५० टक्के भरले; उरमोडीतूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू

सातारा जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने मोठी मजल मारली आहे. अजूनही कोयना धारण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत कोयनानगरला तब्बल १ हजार ५५१ तर महाबळेश्वरला १ हजार ४५३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तसेच धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. कोयनेत तर ५३.६९ टीएमसी म्हणजे एकूण पाणी साठवण क्षमतेच्या (१०५.२५ टीएमसी) पन्नास टक्के पाणीसाठा झाला आहे.

Swapnil S

कराड : सातारा जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने मोठी मजल मारली आहे. अजूनही कोयना धारण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत कोयनानगरला तब्बल १ हजार ५५१ तर महाबळेश्वरला १ हजार ४५३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तसेच धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. कोयनेत तर ५३.६९ टीएमसी म्हणजे एकूण पाणी साठवण क्षमतेच्या (१०५.२५ टीएमसी) पन्नास टक्के पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण अर्धे भरले असून उरमोडी धरणाच्या चारही वक्र दरवाजातूनही विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मागील १५ मेपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात संततधारसारखा पाऊस पडत आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. तसेच या पावसामुळेच ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. त्यातच पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी यासारख्या प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस होत आहे. विशेष करून कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर आहे.

मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोयनानगर येथे २४ मिलिमीटर पाऊस झाला तर नवजा येथे ३० आणि महाबळेश्वरला १६ मिलिमीटर पाऊस झाला आहे तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला १ हजार ५७५, महाबळेश्वरला १ हजार ४६९ आणि नवजाला १ हजार ३५४ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. अद्यापही कोयना धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने आवकही टिकून आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात २९ हजार ७९३ क्युसेक वेगाने पाणी येत होते तर धरणात ५१.७७ टक्के म्हणजे ५४.४९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

मराठी पाऊल पडते पुढे

जुलै महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'