प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

कोयना धरणाची सुरक्षितता आणखी बळकट होणार; भूकंप धक्क्याच्या परिणामासाठी तीन उपकरणे बसवणार

कोयना धरणाच्या सुरक्षेबाबत सरकारने दक्षता घेतली असून कोयनेच्या परिसरात होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे त्याचा कोयना धरणावर काय परिणाम होतो ? याचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट स्वरूपाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.

Swapnil S

कराड : कोयना धरणाच्या सुरक्षेबाबत सरकारने दक्षता घेतली असून कोयनेच्या परिसरात होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे त्याचा कोयना धरणावर काय परिणाम होतो ? याचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट स्वरूपाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. राज्य सरकारने हे काम हाती घेतल्यामुळे कोयना धरणाची सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. सदर भूकंपमापनाचे काम भारतीय हवामान विभागाकडे असून या विभागाचे एक केंद्र महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या नाशिक मुख्यालयात आहे. धरण सुरक्षितता कायदा लागू झाल्यामुळे धरणांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे कोयना धरण सुरक्षितता विभागाने प्राधान्यक्रम बदलला आहे.

कोयना परिसरात ११ डिसेंबर १९६७ रोजी सहा रिश्टर स्केलचा महाविनाशकारी भूकंप झाला होता. त्यानंतर एक ते तीन रिश्टर स्केलचे भूकंप या परिसरात नेहमी होत असतात.

कोयना, पाटण, हेळवाक आणि पोफळीतील सह्याद्री घाटपरिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू असतो. या भागात भूकंप झाल्यानंतर पाटण, कराड, शिराळा, चिपळूण, देवरूख, संगमेश्वर, खेड भागातील गावांमध्ये त्याचे धक्के बसतात. त्यामुळे आता भूकंपमापनाऐवजी भूकंपाच्या धक्क्यांमुळे धरणावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचा भविष्यातील धरणांच्या रचनेत कसा उपयोग होईल,त्याअनुषंगाने भूकंपाच्या धक्क्यांचा धरणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी 'स्ट्राँग्र मोशन एक्सेलेरोग्राफ' बसविण्याचे निश्चित झाले आहे. त्याला सरकारकडून मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे.

कोयना धरणातील जलसाठा, भूगर्भातील हालचाली आदींचा वेध घेण्यासाठी धरणात विविध प्रकारांची उपकरणे कार्यरत असतात. नुकतीच कोयनेत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली होती.बैठकीत धरणाच्या सुरक्षितता विभागाने प्रमुख धरणांमध्ये भूकंप मापनासाठी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कोयना धरणाच्या तळाशी, मध्यभागी आणि वरील भागात प्रत्येकी तीन उपकरणे बसवली जाणार आहेत. याबाबतची अंमलबजावणी सुरुही करण्यात आली आहे.त्यामार्फत संकलित होणाऱ्या माहितीद्वारे भूकंपाच्या धक्क्यांमुळे होणाऱ्या धरणाच्या संभाव्य नुकसानीचा अभ्यास करता येणार आहे.

कोयना धरण परिसरात दरवर्षी किती भूकंप होतात.त्यांची संख्या आणि तीव्रता जाणून घेण्यासाठी कोयनेत स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. या कामासाठी पुरेसा निधीही उपलब्ध आहे. त्यामुळे हे काम आता नियमित सुरू आहे. सुरक्षितता आणि सुधारणा यासंदर्भातील काही कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातून कोयना धरणाची सुरक्षितता अधिक बळकट होणार आहे.

- नितीन पोतदार, कार्यकारी अभियंता कोयना धरण व्यवस्थापन विभाग

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे