कृष्णा कारखान्यासाठी आज मतदान; १५४ केंद्रांवर १५२८ कर्मचाऱ्यांची नेमणूक, दोन जिल्ह्यांतील १५३ मतदान केंद्रांवर लगबग Facebook : Atul Bhosale
महाराष्ट्र

कृष्णा कारखान्यासाठी आज मतदान; १५४ केंद्रांवर १५२८ कर्मचाऱ्यांची नेमणूक, दोन जिल्ह्यांतील १५३ मतदान केंद्रांवर लगबग

कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, २१ जून रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारपासूनच मतदान साहित्य घेऊन सर्व कर्मचारी आपापल्या नियुक्त मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत.

Swapnil S

कराड : कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, २१ जून रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारपासूनच मतदान साहित्य घेऊन सर्व कर्मचारी आपापल्या नियुक्त मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या थेट मार्गदर्शनाखाली या सर्व मतदान साहित्याचे पद्धतशीर वाटप करण्यात आले असून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण १५२८ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा व सांगली अशा दोन जिल्ह्यांत आणि पाच तालुक्यांमध्ये विस्तारलेले असल्याने ही निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही जिल्ह्यांतील एकूण १५४ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ही मतदान प्रक्रिया पार पडेल. यामध्ये सातारा जिल्ह्यात ८९, तर सांगली जिल्ह्यात ६४ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी, २३ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, शांततापूर्ण आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व प्रकारची जय्यत तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

विधिमंडळाचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन टायगर, पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी, विषारी दारूकांडाचे मुद्दे गाजणार

Mumbai : उच्च रक्तदाब ठरतोय आरोग्याचा मोठा धोका; फादर्स डे निमित्ताने डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

गॅस दरवाढीचा फटका तेल कंपन्यांनी सोसला; विविध देशातून भारताने मागवला LPG

१०१६ मेट्रिक टन आंब्याची विक्रमी निर्यात; लासलगाव येथून तीन देशांमध्ये हापूस आणि केशर आंबा रवाना

Mumbai : कंत्राटदारांना ५५ कोटींचा दंड, वसुली मात्र २३ कोटींची; रस्ते कामात निकृष्ट दर्जा, दिरंगाईबद्दल केला होता दंड