अजित पवारांच्या नावाने 'लाडकी बहीण' योजना? नामकरण करण्याच्या मागणीवर विचार करू - फडणवीस 
महाराष्ट्र

अजित पवारांच्या नावाने 'लाडकी बहीण' योजना? नामकरण करण्याच्या मागणीवर विचार करू - फडणवीस

दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नावाने 'लाडकी बहीण' योजनेचे नामकरण करण्याच्या मागणीचा सरकार विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.

Swapnil S

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नावाने 'लाडकी बहीण' योजनेचे नामकरण करण्याच्या मागणीचा सरकार विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंगळवारी मागणी केली होती की, महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी असलेल्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' या योजनेचे नाव पवार यांच्या नावाने ठेवण्यात यावे.

फडणवीस म्हणाले, अनेक मागण्या आहेत. आम्ही एकत्र बसून यावर कसे पुढे जायचे याचा विचार करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते पवार आणि इतर चार जणांचा २८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला होता.

मिटकरी म्हणाले होते की, अजितदादा हे राज्यातील महिलांचे आवडते भाऊ होते. राज्यात यात्रा करताना त्यांच्या मनगटावर राख्यांनी भरलेल्या असायच्या. जर राज्य सरकारने या योजनेचे नाव 'अजितदादांची लाडकी बहीण योजना' असे ठेवले, तर ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.

पवार अर्थमंत्री असताना घोषित केलेली आणि जुलै २०२४ मध्ये सुरू झालेली 'लाडकी बहीण' योजना २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना थेट बँक हस्तांतरणाद्वारे दरमहा १,५०० रुपयांची मदत देते.

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; आतापर्यंत १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना लाभ

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

VIP दर्शनावरून मंदिरात राडा; आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावली, प्रत्युत्तरात पोलिसानेही उगारला हात, Video

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड