महाराष्ट्र

लाडकी बहिण योजना: २६ लाख लाभार्थींवर कारवाईची टांगती तलवार; क्षेत्रीय स्तरावर छाननी प्रक्रिया सुरू; मंत्री तटकरेंचा इशारा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत २६ लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र नसल्याचे समोर आले आहे. आता या सगळ्या लाभार्थ्यांची जिल्हास्तरावर छाननी प्रक्रिया सुरु आहे. छाननी प्रक्रियेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे.

Krantee V. Kale

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत २६ लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र नसल्याचे समोर आले आहे. आता या सगळ्या लाभार्थ्यांची जिल्हास्तरावर छाननी प्रक्रिया सुरु आहे.

छाननी प्रक्रियेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे.

लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर २ कोटी ६२ लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले. मात्र केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ काही महिला घेत असल्याचे निष्पन्न झाले. महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचे पडताळणीत समोर आले. त्यामुळे १० लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले.

पाच लाख महिलांचे आधार कार्ड बँकशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सद्यस्थितीत २ कोटी ४७ लाख पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र योजनेतील अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असल्याने २६ लाख अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आली असल्याचेही सांगण्यात आले.

राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट

आझाद मैदानात उपोषण करण्यास HC ची मनाई; पण जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम; म्हणाले - "कोर्ट आम्हाला १०० टक्के...

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटलांना हायकोर्टाचा धक्का; परवानगीशिवाय आझाद मैदानात उपोषणास मनाई

'या रीलमध्ये चुकीचं काय?' रोहित पवारांकडून अथर्व सुदामेची पाठराखण; 'तो' व्हिडिओही पुन्हा केला शेअर

विवाहित लेकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पकडले; बापाने दोघांनाही विहिरीत ढकलून संपवले, धक्कादायक घटनेने नांदेड हादरले