महाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

महायुती सरकारने जाहीर केलेल्या कुठल्याही योजना बंद करायच्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार अशी ओरड विरोधक करत असले तरी ही योजना बंद होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार या विरोधकांच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिले. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीआधी जुलै २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यानंतर २ कोटी ६२ लाख महिलांनी अर्ज केले. अर्जांची छाननी प्रक्रिया केली असता विविध कारणांमुळे १० लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या. त्यामुळे सद्यस्थितीत २ कोटी ४७ लाख पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात प्रति लाभार्थी १५०० रुपये जमा होत आहेत. मात्र आगामी निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे.

महायुती सरकारने जाहीर केलेल्या कुठल्याही योजना बंद करायच्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार अशी ओरड विरोधक करत असले तरी ही योजना बंद होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पाच वर्षांनी आमचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केले तर अजून पाच वर्षांपर्यंत तुम्हाला सवलत देऊ, असेही ते म्हणाले. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. फलटण येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे पॅकेज!

आपले महायुतीचे सरकार आहे, ते विकासाचा विचार करणारे सरकार आहे. आम्हाला समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास हवाय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे, असे फडणवीस म्हणाले.

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

भारतातील रुग्णालयांचे दर हे हिमनगाचे टोक; आरोग्य सेवा क्षेत्र भांडवलप्रधान असल्याचा नॅटहेल्थचा अहवाल

कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह तत्काळ सुरू करा; महापौर रितू तावडेंचे निर्देश

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया