महाराष्ट्र

पाच लाख बहिणी वेटिंगवर; वर्षभरानंतरही आधार कार्ड-बँक जोडणी नाहीच

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत महिना १,५०० रुपये मिळतील या आशेने राज्यातील २ कोटी ६२ लाख महिलांनी अर्ज केला. यापैकी ९ लाखांहून अधिक महिला विविध कारणांमुळे अपात्र ठरल्या. त्यामुळे दोन कोटी ५२ लाख पात्र महिलांना महिना १,५०० रुपये लाभ मिळणे अपेक्षित असताना २ कोटी ४७ लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत.

गिरीश चित्रे

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत महिना १,५०० रुपये मिळतील या आशेने राज्यातील २ कोटी ६२ लाख महिलांनी अर्ज केला. यापैकी ९ लाखांहून अधिक महिला विविध कारणांमुळे अपात्र ठरल्या. त्यामुळे दोन कोटी ५२ लाख पात्र महिलांना महिना १,५०० रुपये लाभ मिळणे अपेक्षित असताना २ कोटी ४७ लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत. मात्र जुलै २०२४ मध्ये अर्ज करूनही आधार कार्ड बँकेशी लिंक होत नसल्याने ५ लाख लाडक्या बहिणींना महिना १,५०० रुपये मिळण्यासाठी वेटिंगवरच आहेच. दरम्यान, या विषयी विचारणा करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना फोनवर संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. योजनेची घोषणा होताच २ कोटी ६२ लाख महिलांनी अर्ज केले. विशेष म्हणजे योजनेची घोषणा झाली महिलांनी अर्ज केले आणि तातडीने अंमलबजावणी करत महिलांच्या बँक खात्यात महिना १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. योजनेचा लाभ पात्र महिलांना मिळू लागला आणि ऐन निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने निवडणुकीत विजय झाला तर १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ असे जाहीर केले. महायुतीच्या घोषणेनंतर विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली आणि महायुतीची सत्ता राज्यात आली. मात्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट पात्र महिलांना पैसे देण्यासाठी आणायचे कुठून असा प्रश्न महायुतीला सतावू लागला आणि हळुवार अर्जाची छाननी प्रक्रिया राबत आतापर्यंत १० लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत २ कोटी ५२ लाख महिला पैकी २ कोटी ४७ लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जात आहेत. मात्र उर्वरित पाच लाख लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँकेशी लिंकच होत नसल्याने त्या वेटिंगवरच आहेत. दरम्यान, जुलै २०२४ मध्ये योजनेची घोषणा केली त्यावेळी या योजनेसाठी वर्षांला ४५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने पैशांची जमवाजमव करण्यात महायुतीच्या नेत्यांची दमछाक झाली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मे २०२५ पर्यंत ११ लाभ म्हणजे १६ हजार ५०० रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. 'नमो शेतकरी सन्मान योजना' अंतर्गत दरमहा १,००० रुपये लाभ घेत असलेल्या ७, लाख ७४ हजार १४८ महिलांना, लाडकी बहीण योजनेचे केवळ ५०० रुपये सन्मान निधी दिला जात आहे.

पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाभार्थी

  • संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी - २ लाख ३० हजार

  • ६५ वर्षांपेक्षा जास्त वय - १ लाख १० हजार

  • चारचाकी वाहने असलेल्या - १ लाख ६० हजार

  • नमो शेतकरी योजनेतील : ७ लाख ७४ हजार

  • सरकारी नोकरीतील - २ हजार ६५२

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार