लासलगाव : कांदा खरेदी दरात वाढ; आज विरोधकांचा मोर्चा  
महाराष्ट्र

लासलगाव : कांदा खरेदी दरात वाढ; आज विरोधकांचा मोर्चा

राज्य सरकारने शासकीय उन्हाळ कांदा खरेदी दरात ३ रुपये ४५ पैशांची वाढ करत आता १५ रुपये ८० पैसे प्रति किलो दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

लासलगाव : राज्य सरकारने शासकीय उन्हाळ कांदा खरेदी दरात ३ रुपये ४५ पैशांची  वाढ करत आता १५ रुपये ८० पैसे प्रति किलो दराने  खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रश्नावर  शासनाचे लक्ष  वेधण्यासाठी  महाविकास आघाडी तर्फे  मंगळवार, २६ रोजी सकाळी ९ वाजता चांदवड चौफुली मुंबई आग्रा महामार्ग येथे कांदा उत्पादक शेतकरी आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहेत. या महामोर्चामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आदी हजर राहणार आहेत.

यापूर्वी उन्हाळ कांद्याची शासकीय खरेदी प्रतिकिलो १२ रुपये ३५ पैसे दराने  करण्यात येत होती. मात्र हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असल्याची टीका शेतकरी संघटना तसेच विरोधकांकडून सातत्याने केली जात होती. बाजार समित्यांमध्ये शासकीय दरापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीकडे पाठ फिरवली होती. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी ए ग्रेडच्या कांद्याला प्रतिकिलो १८ रुपये १२ पैसे असा दर मिळाला. त्यामुळे खुल्या बाजारातील दर आणि शासकीय खरेदी दर यामधील फरक अद्याप कायम असल्याचे चित्र आहे.

Mumbai : चर भरण्याचा खर्च ६१८ कोटींवर; स्थायी समितीत वादळी चर्चा होण्याची शक्यता, रस्त्यांवरील चर बुजवा अन्यथा दुप्पट रक्कम भरा - BMC चा इशारा

Fuel Price Hike : चौथ्यांदा इंधन भडका; पेट्रोलचे भाव २.६१ ने, तर डिझेल २.७१ ने वाढले

‘कॉकरोच’विरोधी याचिकेची तातडीने सुनावणी नाही; न्यायमूर्ती म्हणाले, भावनिक होऊ नका

भोंदू अशोक खरात प्रकरण : खरातला २६ पर्यंत ईडी कोठडी

Assam UCC Bill : आसामातही होणार समान नागरी कायदा