महाराष्ट्र

किरकोळ भांडणात विद्यार्थिनीला जामीन मंजूर

खोलीचा दरवाजा उघडा ठेवण्यावरून झालेल्या भांडणात रूममेटला भाजल्याचा आरोप असलेल्या विद्यार्थिनीला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अर्जदार विद्यार्थिनी लाॅ शिकत आहे. तिने रूममेट तरुणीला भाजल्याने झालेल्या जखमा गंभीर असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित झालेले नाही, असे निरीक्षण न्या. श्याम चांडक यांनी नोंदवले आणि आरोपी विद्यार्थिनीला जामीन मंजूर करीत मोठा दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : खोलीचा दरवाजा उघडा ठेवण्यावरून झालेल्या भांडणात रूममेटला भाजल्याचा आरोप असलेल्या विद्यार्थिनीला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अर्जदार विद्यार्थिनी लाॅ शिकत आहे. तिने रूममेट तरुणीला भाजल्याने झालेल्या जखमा गंभीर असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित झालेले नाही, असे निरीक्षण न्या. श्याम चांडक यांनी नोंदवले आणि आरोपी विद्यार्थिनीला जामीन मंजूर करीत मोठा दिलासा दिला.

पुण्यात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या दोन तरुणींमध्ये वाद झाला होता. त्या वादातून कथित घटना २५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २.५० वाजताच्या सुमारास घडली होती. पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिल्याने लाॅच्या विद्यार्थिनीने ॲड. कुणाल पाटील, ॲड. प्रशांत राऊळ आणि ॲड. प्रसाद निकम यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तिच्या अर्जावर न्या. श्याम चांडक यांच्यापुढे सुनावणी झाली. घटनेचा तपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे यावेळी न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर न्या. चांडक यांनी कथित घटना आणि सरकारी पक्षाने केलेल्या आरोपांच्या आधारे नेमकी वस्तुस्थिती गांभीर्याने तपासून अर्जदार विद्यार्थिनीला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. कथित घटना क्षुल्लक कारणावरून घडल्याचे दिसून येते.

अर्जदार तरुणी लाॅची विद्यार्थिनी असून तिचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. अशा स्थितीत तिला ताब्यात घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने अर्ज मंजूर केला.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश