महाराष्ट्र

Budget 2024: महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली -खा. अमोल कोल्हे

Swapnil S

यंदाच्या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश, बिहारवर सवलतींची खैरात करण्यात आली असताना महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसण्यात आल्याची धारदार टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. डॉ. कोल्हे म्हणाले, “केंद्र सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो!!” असा आहे. ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर सरकार उभे आहे, त्या जेडीयू आणि टीडीपी या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करून बिहार आणि आंध्र प्रदेशवर सवलतींची, योजनांची खैरात करण्यात आली आहे. बिहार व आंध्र प्रदेशला निधी मिळतो, याविषयी कुणालाही दु:ख वाटण्याचे कारण नाही.

परंतु जो महाराष्ट्र देशाला सर्वाधिक महसूल देतो, त्या महाराष्ट्राच्या तोंडाला एनडीए सरकारने अक्षरश: पाने पुसली आहेत. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी दिल्लीवाऱ्या करीत असते. ते ट्रिपल इंजिन सरकार काय करते, असा प्रश्न यातून निर्माण होतो. ट्रिपल इंजिन सरकारची केंद्र सरकारमध्ये काही भूमिका आहे, असे आताच्या एनडीए सरकारला वाटत नाही का? जर वाटत असेल, तर महाराष्ट्राच्या वाट्याला भरघोस व घसघशीत दान का पडले नाही, अशा प्रश्नांची सरबत्तीही डॉ. कोल्हे यांनी केली. खरे तर महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन