महाराष्ट्र

महायुतीतही मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग; शिवसेनेकडून 'पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री' मोहीम

महायुतीत सारे काही आलबेल आहे असे वाटत असतानाच शिवसेनेने "पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री" ही मोहीम सुरू केली असून त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे.

रविकिरण देशमुख

मुंबई : महायुतीत सारे काही आलबेल आहे असे वाटत असतानाच शिवसेनेने "पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री" ही मोहीम सुरू केली असून त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. 'च' या शब्दावर जोर देत असतानाच प्रचाराचा फोकसही ठरवण्याची व्यूहरचना शिवसेनेने आखल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.

बुधवारी रिपोर्ट कार्ड सादर करण्यासाठी महायुतीची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. मुख्यमंत्रिपदासाठी तुमचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न त्यावेळी विचारला गेला असता उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री येथे आहेत, हे वाक्य जणू शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब आहे, अशा अर्थाने घेतले गेले.

पण वस्तुस्थिती निराळीच असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राजकीय सूत्रांच्या मते, काही दिवसांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या एका बैठकीत एकनाथ शिंदे यांनी विधानसभा

निवडणुकीदरम्यान आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून सादर केले जावे, अशी मागणी केली, पण त्यावेळी त्यांना ठोस असे आश्वासन दिले गेले नव्हते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी शिवाजी मंदिर येथे आयोजित केलेल्या बैठकीत सेनेच्या - वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच हवेत, अशा घोषणा दिल्या. शुक्रवारी सकाळीच पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री ही एक चित्रफितही जारी करण्यात आली. यात 'माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांनी व्यक्त केलेल्या भावना दाखविण्यात आल्या. त्यांनी शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.

बैठकीला खासदार मिलिंद देवरा आणि रवींद्र वायकर, माजी खासदार गजानन कीर्तीकर आणि राहुल शेवाळे तसेच आमदार दिलीप लांडे, प्रकाश सुर्वे, मनीषा कायंदे आदी उपस्थित होते.

आ. लांडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुक्तकंठाने स्तुती केली. 'नाथांचे नाथ, एकनाथ शिंदे' अशी घोषणाही दिली. ते करत असलेल्या मदतीबाबतही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आ. सुर्वे म्हणाले की, खरे गद्दार कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे. आपण राष्ट्रीय उद्यानात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आम्ही उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची वाट पाहून थकलो, पण त्यांनी आमचे फोनसुद्धा घेतले नाहीत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी