महाराष्ट्र

बीडमध्ये चुरशीची लढत; पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? बघा दुपारी १.३० पर्यंतची आकडेवारी

Swapnil S

बीड लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील ( दुपारी १.३० पर्यंतची मतमोजणी) आकडेवारीनुसार पंकजा मुंडे येथून पिछाडीवर आहेत.

दुपारी १.३० पर्यंतच्या मतमोजणीनुसार, बजरंग सोनवणे १,११,७८१ मतांसह २,०९७ मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. तर, पंकजा मुंडे १,०९,६८४ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सकाळी ११.३० पर्यंतच्या मतमोजणीनुसारही बजरंग सोनवणे ५०,४०१ मते घेऊन ५,९४९ मतांच्या फरकाने आघाडीवर होते.

निवडणूक आयोग संकेतस्थळ, दुपारी १.३० पर्यंतची आकडेवारी

दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा -

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी - भाजप १३, शिंदे गट ५, ठाकरे गट ११, शरद पवार गट ७, काँग्रेस १०, अजित पवार गट १ आणि अपक्ष एका जागेवर पुढे आहेत.

सकाळी ११ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा -

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी - भाजप ११, शिंदे गट ६, ठाकरे गट ११, शरद पवार गट ८, काँग्रेस १० आणि अजित पवार गट एका जागेवर पुढे आहेत.

राज्यातील २८९ ठिकाणी ४,३०९ टेबलांवर मतमोजणी होत आहे. राज्यात १४,५०७ कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात केले आहेत. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जनता काय कौल देते याकडे सत्ताधारी 'महायुती' व विरोधी 'महाआघाडी'चे लक्ष आहे. 

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त