महाराष्ट्र

मध्यप्रदेशात भीषण अपघात; महाराष्ट्रातील २ चिमुकल्यांसह ११ कामगारांचा मृत्यू

प्रतिनिधी

मध्य प्रदेशामध्ये बसने वाहनाला दिलेल्या धडकेत ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बेतूल येथे गुरुवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील होते. बसने दिलेल्या धडकेनंतर कारचा अक्षरश: चुराडा झाला होता. पोलिसांना पत्रा कापून काही मृतदेह बाहेर काढावे लागले. एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कामगार महाराष्ट्रातील अमरावरती येथे निघाले होते. रात्री २ वाजता बसने त्यांच्या एसयुव्हीला धडक दिली. अपघातानंतर सात मृतदेह तात्काळ बाहेर काढण्यात आले. एसयुव्ही बसच्या आतमध्ये घुसली असल्याने इतर मृतदेह काढण्यासाठी तिचा पत्रा कापावा लागला अशी माहिती बेतुलचे पोलीस अधिक्षक सिमला प्रसाद यांनी दिली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन