महाड शिवसेना- राष्ट्रवादी राडा प्रकरण : मंत्री भरत गोगावलेंच्या मुलासह इतरांवर गुन्हे दाखल 
महाराष्ट्र

महाड शिवसेना- राष्ट्रवादी राडा प्रकरण : मंत्री भरत गोगावलेंच्या मुलासह इतरांवर गुन्हे दाखल

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानादरम्यान आमदार भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्या समर्थकांमध्ये महाड येथे झालेल्या राड्याप्रकरणी गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले, महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यासह ८ जणांवर २१ विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Swapnil S

महाड : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानादरम्यान आमदार भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्या समर्थकांमध्ये महाड येथे झालेल्या राड्याप्रकरणी गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले, महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यासह ८ जणांवर २१ विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी रात्री उशिरा हा गुन्हा महाड तालुका पोलीस ठाण्यात दाखल करून तपासाकरिता महाड शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीनसह मतदान यंत्रकक्षाची पूजा केल्याबद्दल वडगाव मावळ पोलिसांनी भाजपच्या उमेदवार ॲड मृणाल गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीच्या उमेदवार अबोली मयुर ढोरे आणि माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे या तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात १७ ते २० मार्चदरम्यान वादळी पावसाचा इशारा

देशात एलपीजी, पेट्रोल, डिझेलची कमतरता नाही; केंद्राची पत्रकार परिषदेत माहिती

भारताला होर्मुझमधून सुरक्षित मार्ग देऊ; इराणने मैत्रीखातर दर्शवली तयारी

Mumbai : पायाभूत प्रकल्पांसाठी FD मोडून १२ हजार कोटींची तरतूद; उदय सामंत यांची माहिती

'रील्स'ची नशा आपला घात करणार