संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवे चेहरे; पहिल्या यादीत ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा, मुंबईतील १३ उमेदवारही जाहीर

‘मविआ’च्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून बरेचसे नवे चेहरे मैदानात उतरवण्यात आले आहेत.

Swapnil S

मुंबई : ‘मविआ’च्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून बरेचसे नवे चेहरे मैदानात उतरवण्यात आले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईतील १३ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

२०१९ नंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे. महाराष्ट्रात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या सगळ्यांनीच कंबर कसली आहे. परंतु, सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे ते उद्धव ठाकरे यांच्या खेळीकडे. याला भाजप व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्षाची किनार आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याभोवती राज्याचे राजकारण फिरत आहे.

भाजपने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत फूट पाडल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्रातील जनतेच्याच नाहीत, तर संपूर्ण देशाच्या नजरा लागलेल्या आहेत. सर्वसामान्य जनतेचे या फोडाफोडीच्या राजकारणाबाबत काय मत आहे ते या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात प्रचंड फटका बसला. पण ठाकरे गटापेक्षा काँग्रेसला सर्वाधिक जागांवर यश मिळाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध ठाकरे गटाकडून केदार दिघे मैदानात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघात माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर चाळीसगावातून उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

शिवडी मतदारसंघात सस्पेन्स कायम

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवडी विधानसभा मतदारसंघात कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पहिल्या यादीत ठाकरे गटाने शिवडीतील उमेदवार घोषित न केल्याने तेथे कोणाला संधी मिळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेत नवे चेहरे

वरूण सरदेसाई - वांद्रे पूर्व

महेश सावंत - माहीम

प्रविणा मोरजकर - कुर्ला नेहरु नगर

केदार दिघे - ठाणे, कोपरी पाचपाखाडी

स्नेहल जगताप - महाड

समीर देसाई - गोरेगाव

अनंत (बाळा) नर - जोगेश्वरी पूर्व

उदेश पाटकर - मागाठाणे

विद्यमान आमदारांना उमेदवारी

आदित्य ठाकरे - वरळी

सुनील राऊत - विक्रोळी

रमेश कोरगावकर - भांडुप पश्चिम

सुनील प्रभू - दिंडोशी

ॠतुजा लटके - अंधेरी पूर्व

प्रकाश फातर्पेकर - चेंबूर

संजय पोतनीस - कालिना

‘मविआ’चे समान जागावाटप; काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट प्रत्येकी ८५ जागा लढवणार, १८ जागा मित्रपक्षांना, १५ जागांबाबत उत्सुकता

अजितदादांच्या यादीत चारच लाडक्या बहिणी; राष्ट्रवादी काँग्रेसचे ३८ उमेदवार जाहीर

शिंदेंचाही घराणेशाहीवर भरवसा; ४५ उमेदवार जाहीर, माहीममध्ये अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर!

भरगच्च गर्दीत चढणं जीवावर बेतलं; कर्जत लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू, अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान घटना

मुस्लिमांच्या विवाह नोंदणीचा मार्ग मोकळा! एकापेक्षा अधिक विवाहांच्या नोंदणीला कायद्याचा अडसर नाही; न्यायालयाचा निर्वाळा