'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

शाळा, कॉलेज परिसरात 'स्टिंग ड्रिंक' विक्रीवर बंदी

शाळा आणि महाविद्यालयांच्या   ५०० मीटरच्या परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंक’च्या विक्रीस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

Swapnil S

मुंबई : शाळा आणि महाविद्यालयांच्या   ५०० मीटरच्या परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंक’च्या विक्रीस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरणारे अन्नपदार्थ तसेच कॅफिनयुक्त पेयांची विक्री आढळून आल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

'स्टिंग' एनर्जी ड्रिंकमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत भाजपच्या    विक्रम पाचपुते यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर या पेयाच्या बाटलीवर गरोदर महिला किंवा स्तनदा माता, लहान मुले आणि कॅफिनची ॲलर्जी असलेल्या व्यक्ती यांच्यासाठी अयोग्य असे स्पष्ट अक्षरात लिहिण्याचे बंधनकारक करण्यात आले असून शाळांच्या ५०० मीटरच्या परिघात या पेयाच्या विक्रीला बंदी घालण्यात येणार असल्याचे झिरवाळ यांनी यावेळी जाहीर केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा