महाराष्ट्र

भजनी मंडळांना २५ हजारांचे अनुदान; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

राज्यात १८०० भजनी मंडळी असून त्यांना भजनाचे साहित्य खरेदीसाठी आता २५ हजार रुपयांचे भांडवल अनुदान म्हणून मिळणार आहे. यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा देण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी २५ हजार रुपयांचे भांडवली अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : राज्यात १८०० भजनी मंडळी असून त्यांना भजनाचे साहित्य खरेदीसाठी आता २५ हजार रुपयांचे भांडवल अनुदान म्हणून मिळणार आहे. यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा देण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी २५ हजार रुपयांचे भांडवली अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

महाराष्ट्रात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. राज्यभरात गणेशोत्सवात भजनी मंडळांना विविध कार्यक्रमांसाठी बोलवण्यात येते. भजनी मंडळींना कार्यक्रम करण्यासाठी साहित्याची गरज भासते. त्यामुळे साहित्य खरेदीसाठी भांडवली अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भजनी मंडळींसाठी २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

Mumbai: इमारतच अस्तित्वात नाही, तरी १४३ मतदार; बोरिवलीतील धक्कादायक प्रकार; कोऱ्या ओळखपत्रांद्वारे ‘वोट चोरी’

महासत्तेची महत्त्वाकांक्षा बाळगणे गैर नाही पण...; रघुराम राजन यांनी दिला इशारा

BMC निवडणुकीसाठी शिंदे यांचे १० हजार कोटींचे बजेट; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

म्हाडाच्या जमिनीवर अतिक्रमण; शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर अडचणीत; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश