महाराष्ट्र

दहावी, बारावीचा निकाल ५ जूनपूर्वी?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षांच्या आतापर्यंत ८५ टक्के उत्तरपत्रिका...

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षांच्या आतापर्यंत ८५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या असून दहावी आणि बारावीचा निकाल ५ जूनपूर्वी लागण्याची शक्यता आहे.

सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण ऑनलाईन माध्यमातून बोर्डाकडे पाठवले आहेत. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागतो, तर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होतो. मात्र, यावर्षी दोन्ही वर्गाचे निकाल ५ जूनपूर्वी लागण्याची शक्यता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल