ईव्हीएम मशीन फोडत निषेध 
महाराष्ट्र

पोटनिवडणूक झालीच पाहिजे; उत्तम जानकर यांची मागणी; बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी लोकचळवळ

पोटनिवडणूक पुन्हा घ्या हा माझा एकट्याचा प्रश्न नाही, तर १५० उमेदवारांचा प्रश्न आहे. त्यामुळे आता माघार नाही. मारकडवाडी मतदारसंघात पोटनिवडणूक झालीच पाहिजे यासाठी सुप्रीम कोर्ट, केंद्रीय निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठवावा लागला तरी चालेल, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. मी आता राजीनामा देतो...

गिरीश चित्रे

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमुळे विजय मिळाला आहे. सोलापूर येथील मारकडवाडी मतदारसंघात मी विधानसभा निवडणुकीत विजयी झालो, मात्र १३ हजार १७८ मतांनी विजयी झालो हे मला आणि मारकडवाडीतील ग्रामस्थांना मान्य नाही. पोटनिवडणूक पुन्हा घ्या हा माझा एकट्याचा प्रश्न नाही, तर १५० उमेदवारांचा प्रश्न आहे. त्यामुळे आता माघार नाही. मारकडवाडी मतदारसंघात पोटनिवडणूक झालीच पाहिजे यासाठी सुप्रीम कोर्ट, केंद्रीय निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठवावा लागला तरी चालेल, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. मी आता राजीनामा देतो. निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, असे खुले आव्हान जानकर यांनी निवडणूक आयोगाला दिले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित 'मतपत्रिकेवर मतदान लोक चळवळ उभारणार' या कार्यक्रमात ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने एक हाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान दिला आहे. मात्र महाविकास आघाडीचे नेते असो वा सामाजिक संस्था आदींनी हा मतांचा कौल नसून ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा कौल आहे, असा आरोप केला आहे. त्यात सोलापूर येथील मारकडवाडी मतदारसंघात शरद पवार पक्षाचे विजयी उमेदवार उत्तम जानकर यांना एक लाखांहून अधिक मतांनी विजयी होणार असा विश्वास होता. मात्र फक्त १३ हजार मतांनी विजयी झालो हे ग्रामस्थांना मान्य नाही. त्यामुळे मनातील शंका दूर करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया राबवली. पण निवडणूक आयोग आणि पोलिसांनी आडकाठी केली आणि मतदानाचे साहित्य जप्त केले. ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले. निवडणूक आयोगाची गडबड नसेल तर का घाबरले, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, मी आज राजीनामा देतो. मला मतदारांनी मतदान केले ते कोणाला गेले हे जाणून घ्यायचा त्यांचा अधिकार आहे. निवडणूक आयोग मतदान घेण्यास तयार नाही, तर मी राजीनामा देतो बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घ्या. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाला आणि मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएमविरोधात आवाज उठवला तो जगापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पोटनिवडणूक घेत नाही तोपर्यंत माघार नाही, असा इशारा जानकर यांनी यावेळी दिला.

ईव्हीएम मशीन फोडत निषेध

विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळाला तो इव्हीएममुळे, त्यामुळे लोकांमध्ये रोष असून मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित 'ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाओ' कार्यक्रमात उपस्थित सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर, फिरोज मिठीबोरवला, तिस्ता सेटलवाड, सर्वोच्च न्यायालयाचे अॅड. मेहमूद प्राचा, निरंजन टकले, धनंजय शिंदे, अमित उपाध्याय आदींच्या उपस्थितीत इव्हीएम मशीन फोडत भाजपसह महायुतीचा निषेध व्यक्त केला.

ईव्हीएमच्या घोटाळ्यात मोदींसह अनेक नेते

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले हा भाजपचा विजय नसून ईव्हीएमचा विजय आहे. ज्या मतदारसंघात आपला उमेदवार पडणार त्याठिकाणी ईव्हीएम सेट केले. ईव्हीएम घोटाळा हा आतापुरता मर्यादित नसून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत हेच हत्यार भाजप वापरणार. ईव्हीएमच्या माध्यमातून विजय मिळवण्याच्या कटात पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे नसून अनेक नेते सामील असल्याचा गंभीर आरोप सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला.

आज नागपुरात ईव्हीएमविविरोधात मोर्चा

ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून महायुती विजयी झाले हे सत्य लोकांसमोर येत आहे. त्यामुळे शनिवारी नाशिकमध्ये ईव्हीएमविरोधात मोर्चा काढण्यात आला होता, तर रविवारी नागपूरमध्ये ईव्हीएमविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे कोळसे-पाटील यांनी सांगितले. दरम्यान, नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशन काळात सर्वपक्षीय आमदारानी ईव्हीएमविरोधात लढा देण्यासाठी निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लढाई जिंकणार, लोकशाहीचा विजय होणार !

मारकडवाडी मतदारसंघात माझा विजय झाला असला तरी कमी मतांनी झालाय हे ग्रामस्थ आणि मला मान्य नाही. त्यामुळे पोटनिवडणूक घेण्याचे खुले आव्हान दिले असून ही लढाई जिंकणारच असून लोकशाहीचा विजय होणार, असा विश्वास जानकर यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश