पाच वर्षांत १०० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे लक्ष्य; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार; महापौर परिषदेचे उद्घाटन 
महाराष्ट्र

पाच वर्षांत १०० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे लक्ष्य; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार; महापौर परिषदेचे उद्घाटन

पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील पाच वर्षांत राज्यात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिली.

Swapnil S

मुंबई : पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील पाच वर्षांत राज्यात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिली. एकट्या मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षांत सुमारे ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी आर्थिक गुंतवणुकीबाबत सरकारने निर्धारित केलेल्या लक्ष्याची माहिती दिली. मुंबई महानगरात ३०० किलोमीटरपेक्षा अधिक मेट्रो नेटवर्क, रस्ते, उड्डाणपूल, बोगदे, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पांवर भर दिला जात आहे. शाश्वतता, सक्षम वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांसाठी राहण्यायोग्य शहरे हे शहरी विकासाचे तीन महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे ६५ टक्के असून, शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे ओझे म्हणून न पाहता विकासाची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. त्यासाठी नियोजनबद्ध, शाश्वत आणि नागरिककेंद्रित शहरांची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.

तिसरी, चौथी मुंबई आकाराला येणार

महाराष्ट्राच्या भविष्यातील शहरी विकासाचे चित्र मांडताना मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईच्या निर्मितीचा उल्लेख केला. नवी मुंबई विमानतळ परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत असून, या ‘तिसऱ्या मुंबई’मध्ये एज्यु-सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडि-सिटी, इनोव्हेशन सिटी आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर सिटी विकसित करण्यात येत आहे. तर विरार ते वाढवण परिसरात चौथी मुंबई विकसित करण्यात येत आहे. वाढवण येथे देशातील सर्वांत मोठ्या बंदरांपैकी एक बंदर उभारले जात असून, ते जगातील दहा मोठ्या बंदरांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले...

  • शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी

  • मुंबईतील जुन्या वस्त्या आणि इमारतींचे पुनरुज्जीवन, पुनर्विकास आणि नागरी परिवर्तन सुरू

  • धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून तेथील रहिवाशांना सर्व सुविधांनी युक्त सन्मानजनक घरे देणार

  • पुढील दहा वर्षांत धारावीचा मुंबईचे नवे व्यावसायिक केंद्र म्हणून विकास

  • तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईला आकार देण्याचे काम सुरू

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पायाभूत क्षेत्राला बूस्टर; केंद्र सरकारची ११ हजार कोटींची तरतूद; उपकरण उत्पादनाला मिळणार चालना

आपल्या राज्यघटनेला बळकट करण्याची वचनबद्धता

एल निनोमुळे फिजी अक्षरशः मेटाकुटीला

आजचे राशिभविष्य, २६ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

बाहेरून कुरकुरीत अन् आतून मऊ! नाश्त्याला बनवा उडीद डाळीचे चविष्ट वडे, जाणून घ्या सोपी रेसिपी