महाराष्ट्र

राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ; ३३ नवीन रुग्णांची नोंद

राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस हळूहळू वाढ होत आहे. गुरुवारी ३३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मुंबईत सर्वाधिक २२ रुग्ण, पुण्यात ५, पिंपरी चिंचवड येथे दोन, ठाणे तीन, लातूर एक असे रुग्ण आढळून आले आहेत.

Krantee V. Kale

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस हळूहळू वाढ होत आहे. गुरुवारी ३३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मुंबईत सर्वाधिक २२ रुग्ण, पुण्यात ५, पिंपरी चिंचवड येथे दोन, ठाणे तीन, लातूर एक असे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे २१ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या १४८ वर पोहोचली आहे.

जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण ६,४७७ Covid चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १६५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात केवळ मुंबई विभागात एकूण १४८ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ६१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल