धरणांमध्ये १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा; पाणी जपून वापरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

धरणांमध्ये १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा; पाणी जपून वापरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गत वर्षीच्या तुलनेत यंदा १०१.७७ टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गत वर्षी हा साठा ५५१.८६ टीएमसी होता. मात्र, एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी पडणार असल्याने पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Swapnil S

मुंबई : राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गत वर्षीच्या तुलनेत यंदा १०१.७७ टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गत वर्षी हा साठा ५५१.८६ टीएमसी होता. मात्र, एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी पडणार असल्याने पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जलसंपदा विभागाने सादरीकरणाद्वारे राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि एल-निनो प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली. एल-निनोच्या प्रभावामुळे साठ्यात २०१४ मध्ये १२ टक्के तर २०१५ मध्ये सुमारे १४ टक्के घट झाली. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी ८७२ टीएमसी तर याच दिवशी २०१५ ला ६२५ टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत २०२५ मध्ये १५ ऑक्टोबरला १३३०.९७ टीएमसी पाणीसाठा होता.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार