राज्यात बोगस दातांच्या डॉक्टरांना बसणार आळा; महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडून मराठी नोंदणी प्रमाणपत्रे जारी  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

राज्यात बोगस दातांच्या डॉक्टरांना बसणार आळा; महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडून मराठी नोंदणी प्रमाणपत्रे जारी

महाराष्ट्र राज्य दंत परिषद (एमएसडीसी) यांनी राज्यातील दंतवैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व व नियामक अनुपालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने 'नो युअर डेंटल प्रॅक्टिशनर (केवायडी)' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य दंत परिषद (एमएसडीसी) यांनी राज्यातील दंतवैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व व नियामक अनुपालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने 'नो युअर डेंटल प्रॅक्टिशनर (केवायडी)' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य हेतू राज्यात बेकायदेशीर, अप्रमाणित व नोंदणीविना चालणाऱ्या दंतप्रैक्टिसला आळा घालणे हा आहे.

या उपक्रमांतर्गत परिषदेमार्फत प्रत्येक नोंदणीकृत दंतचिकित्सकाला एक अधिकृत केवायडी शीट प्रदान करण्यात येत आहे. या शीटवर समाविष्ट असलेल्या अद्वितीय क्यूआर कोडद्वारे सर्वसामान्य नागरिक, रुग्ण व संबंधितांना दंतचिकित्सकाची नोंदणी स्थिती, वैधता, स्पेशालिटी व इतर आवश्यक तपशील त्वरित व विश्वसनीय पद्धतीने पडताळता येणार आहे. यामुळे रुग्णांना उपचारासंदर्भात माहितीआधारित निर्णय घेणे सुलभ होऊन दंतसेवांबाबतचा सार्वजनिक विश्वास अधिक दृढ होईल तसेच बोगस दंतवैद्य शोधणे सोपे होईल.

परिषदेकडून सर्व नोंदणीकृत दंतचिकित्सकांना निर्देश देण्यात येत आहेत की, ही केवायडी क्यूआर शीट त्यांच्या दवाखान्याच्या प्रवेशद्वारावर अथवा प्रतीक्षागृहात स्पष्टपणे व ठळकपणे प्रदर्शित करावी.

व्यावसायिक प्रतिष्ठा, विश्वासार्हतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी नमूद केले की, हा उपक्रम हा सार्वजनिक हितसुरक्षेसाठी, दंतव्यवसायातील शुचित्व राखण्यासाठी तसेच व्यावसायिक प्रतिष्ठा व विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यासोबतच, परिषदेमार्फत दि. १ मे २०२६ पासून इंग्रजीसह मराठी नोंदणी प्रमाणपत्रे जारी करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते या नवीन नोंदणी प्रमाणपत्राचे विमोचन करण्यात आले तसेच 'हँडबूक ऑफ प्राक्टिशनर गाइडलाइन्स' या महाराष्ट्र स्टेट डेंटल कॉन्सिलच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. राज्यात हा असा उपक्रम करणारी स्टेट डेंटन काैन्सिल ही पहिली वैद्यकीय परिषद आहे.

डॉक्टरांसाठी पुस्तिका मार्गदर्शक

या पुस्तिकेत दंतवैद्यक व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांसाठी उपयुक्त माहिती आहे. यामध्ये सध्याचे दंतवैद्यक व्यवसायासंदर्भातील कायदे, नैतिक आचरण, क्लिनिक सुरू करताना आवश्यक कागदपत्रे व परवानगी, रुग्णांची माहिती, संमतीपत्र, आपत्कालीन व्यवस्थापन, औषधींचा वापर, आदर्श प्रिस्क्रीप्शन, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम इत्यादी सर्व माहिती उपलब्ध आहे.

Mumbai : मनोरी प्रकल्पाला CRZ ची मंजुरी; समुद्राचे खारे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पाला गती

Mumbai : बीकेसीतील MTNL ची जागा आता नाबार्डच्या ताब्यात; ३५० कोटींचा व्यवहार पूर्ण

ट्युशन फी, डेव्हलपमेंट फीची माहिती देणे बंधनकारक; उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे महाविद्यालयांना निर्देश

चार वर्षांत मुंबईत ३ नवीन कॅन्सर रुग्णालये; सुविधांचे सक्षमीकरण, सायन, नायर आणि जे.जे.त मिळणार अत्याधुनिक उपचार

चेक बाऊन्स प्रकरण : ६ महिन्यांहून जास्त कारावास देऊ शकत नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय