Photo - Canva 
महाराष्ट्र

राज्यात औषध संशोधन केंद्राची उभारणी; गुजरात, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर सुविधा उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय

आरोग्य विज्ञानासाठी जैवतंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरत असून औषध क्षेत्रातील अशा नावीन्यपूर्ण संशोधन आणि विकासासाठी (लाइफ सायन्सेस इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर) सुविधासंपन्न भव्य केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही केली जाईल. गुजरात व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर औषध संशोधन केंद्राची निर्मिती केली जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : आरोग्य विज्ञानासाठी जैवतंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरत असून औषध क्षेत्रातील अशा नावीन्यपूर्ण संशोधन आणि विकासासाठी (लाइफ सायन्सेस इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर) सुविधासंपन्न भव्य केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही केली जाईल. गुजरात व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर औषध संशोधन केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. रोजगार निर्मिती, जागतिक दर्जाच्या औषधे उत्पादनांसाठी संशोधन केंद्राची गरज आहे. हे इनोव्हेशन पार्क निर्माण होणे हे काळाची गरज असून याच्या उभारणीतून महाराष्ट्र हा नावीन्यपूर्ण औषध निर्मिती क्षेत्रात आघाडीवर राहील, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील सहआयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, सहआयुक्त (औषधे) दा. रा. गहाणे, गिरीश हुकरे, व्ही. टी. जाधव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. “औषध निर्मिती क्षेत्रातील कंपन्या यासाठी कामे करत असून त्यास मर्यादा आहेत. अशी संशोधन केंद्रे सुरू केली जात आहेत. गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी असे संशोधन केंद्र उभे राहत असून औषधे गोळ्या, कॅप्सूल इत्यादींच्या विकासासाठी, जैविक व रासायनिक संशोधनासाठी फॉर्म्युलेशन लॅबचे सार्वजनिक-खासगी भागीदारीतून देखील उभारणी केली जात आहे. या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे. या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे औषध, बायोटेक, मेडिकल उपकरणे, डायग्नोस्टिक्स आणि डिजिटल हेल्थ या क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सना आधुनिक सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन तसेच निधी उपलब्ध होईल. यातून राज्यातील औषधनिर्मिती उद्योगक्षेत्रात गुंतवणूक वाढ होईल. स्टार्टअप्सना मार्गदर्शन, प्रशिक्षण सुविधा, रोजगार निर्मिती, जागतिक दर्जाच्या औषधे उत्पादनांसाठी परिपूर्ण संशोधन संस्था म्हणून काम करेल,” असे झिरवाळ यांनी सांगितले.

यावेळी या बैठकीत अन्नसुरक्षा अधिकारी, गुण नियंत्रण व दक्षता शाखेचे अधिकारी उपस्थित होते. हे इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर राज्यातील आरोग्य, औषधनिर्मिती व बायोटेक क्षेत्रातील नावीन्याचा जागतिक केंद्रबिंदू बनण्यास मोठी गती मिळेल. मार्गदर्शनाखाली हे केंद्र राज्याला स्पर्धात्मक लाभ मिळेल, नावीन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळणार आहे, असेही झिरवाळ यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रशासनात मोठा बदल; राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती

निवडणुका होणारच, पण...; सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा निर्णय

२ डिसेंबरच्या निवडणुकांसाठी सरकारचा निर्देश : मतदारांना भरपगारी रजा द्या, अन्यथा ...

Mumbai : बांधकाम प्रदूषणावर हायकोर्टाची कठोर भूमिका; नियमांच्या अंमलबजावणीसाठी नेमली ५ सदस्यांची समिती

"सीझन २ - पुन्हा मुलगी!" मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; सोशल मीडियावर खास पोस्टसोबत दिली गुड न्यूज