महाराष्ट्र

महाराष्ट्र : डंपरची एसटी बसला जोरदार धडक; ४ ठार, २० जखमी

तळा-मांदाड रस्त्यावर एसटी बस आणि भरधाव डंपरने जोरदार टक्कर झाली. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Krantee V. Kale

अलिबाग : तळा-मांदाड रस्त्यावर एसटी बस आणि भरधाव डंपरने जोरदार टक्कर झाली. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

रहाटाड येथून तळा येथे येणारी एसटी बस आणि आगरदंडा दिशेने जाणाऱ्या डंपरमध्ये समोरासमोर टक्कर झाली. यात तृप्ती खुटीकर, लक्ष्मण ढेबे, अनन्या गवाणे, विठ्ठल कजबजे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने तळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तसेच डंपरही निकृष्ट असल्याचे स्थानिकांनी सांगितले. एसटी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे अपघाताची तीव्रता कमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र, तारणे येथील या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. प्रशासनाने या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिकांनी केली.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास