महाराष्ट्र

Maharashtra Elections 2024 : निवडणूक कालावधीत ओपिनियन, एक्झिट पोलवर बंदी

निवडणूक निकालांचे अंदाज १३ नोव्हेंबरला सकाळी ७ ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोल जाहीर करणे, कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध

Swapnil S

मुंबई : निवडणूक आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन ते पोल तसेच एक्झिट पोल) प्रदर्शित करण्यावर प्रतिबंध केला आहे.

भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज १३ नोव्हेंबरला सकाळी ७ ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोल जाहीर करणे, कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे मतदान संपण्याआधी ४८ तासाच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असेही निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

फलटण : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी प्रशांत बनकर अटकेत, पोलिस उपनिरीक्षक अजूनही फरार

‘आपला दवाखाना’ योजनेचा बोजवारा; ठाण्यात ४० केंद्रे बंद, ६ महीने कर्मचाऱ्यांचा पगारही रखडला!

कलाविश्वावर शोककळा! विनोदी ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचे निधन

माथेरानमध्ये दिवाळीचा पर्यटन सीझन ठरला ‘फ्लॉप’; घाट मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन ढिसाळ

७०६ झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करावा; मुंबई उच्च न्यायालयात वकिलाची याचिकेद्वारे मागणी