सरकारी कर्मचाऱ्यांना २ टक्के महागाई भत्ता लागू करा; राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

सरकारी कर्मचाऱ्यांना २ टक्के महागाई भत्ता लागू करा; राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही १ जानेवारी २०२६ पासून २ टक्के महागाई भत्ता वाढ थकबाकीसह तातडीने लागू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Swapnil S

मुंबई : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही १ जानेवारी २०२६ पासून २ टक्के महागाई भत्ता वाढ थकबाकीसह तातडीने लागू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

केंद्राने १ जानेवारी २०२६ पासून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी २ टक्के महागाई भत्ता वाढ केली आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना ही वाढ या आधीच लागू झाली आहे. त्यामुळे सनदी अधिकाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता ५८ वरुन ६० टक्के झाला आहे. मात्र, राज्य सरकारी सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही वाढ अद्याप मिळालेली नाही, याकडे महासंघाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

‘कॅशलेस’ वैद्यकीय सुविधा योजना लागू करा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायिक अधिकाऱ्यांसाठी अलीकडेच 'कॅशलेस' वैद्यकीय सुविधा सुरू केली आहे. या धर्तीवर राज्यातील सनदी अधिकारी तसेच राज्य सेवेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक ‘कॅशलेस’ वैद्यकीय सुविधा योजना लागू करण्याची मागणीही अधिकारी महासंघाने राज्य सरकारकडे केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ठाकरे बंधू अन् मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर? 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' पुस्तकाचे आज प्रकाशन

Pune : सरसकट कर्जमाफी जाहीर करा; सुप्रिया सुळे यांची मागणी, उजनी डेटा सेंटरसह विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका

Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगला भीषण आग; अनेक वाहनांचे नुकसान, एक जखमी, Video

पेटंट कार्यालयाने क्षयरोग औषधाचे पेटंट फेटाळले; स्वस्त उपचारांच्या प्रयत्नांना बळ

Thane : मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा द्यावा; आमदार प्रताप सरनाईक यांचे मत