विनाअनुमती गैरहजर राहणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

विनाअनुमती गैरहजर राहणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी

सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता, विनाअनुमती गैरहजर राहणाऱ्या तसेच मुख्यालय सोडून जाणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता, विनाअनुमती गैरहजर राहणाऱ्या तसेच मुख्यालय सोडून जाणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. राज्य सरकारचा सैनिकी कल्याण विभाग आणि सेवापूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथील अधिनस्त कार्यालयांसाठी सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी परिपत्रक जारी केले.

या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन दिवशी विहित वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात. अनुपस्थितीबाबत किंवा कार्यालयात उशिरा येण्याबाबत वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतली जात नाही. तसेच सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता विनाअनुमती मुख्यालय सोडून जातात, असे सरकारच्या निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर कार्यालयीन शिस्तीचे काटेकोर पालन करण्याकरिता आणि अशा गैरवर्तणुकीला आळा घालण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी परिपत्रक काढून कारवाईचे निर्देश दिले आहेत. अशा गैरहजेरीच्या कालावधीसाठी रजा वेतन देय असणार नाही आणि संबंधित महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ नियम ४८ नुसार शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र राहील, असे नमूद करण्यात आले आहे.

अधिकारी, कर्मचारी वारंवार विनाअनुमती कार्यालयात गैरहजर राहिल्यास किंवा विनाअनुमती मुख्यालय सोडून गेल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबन अथवा शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यासाठी त्यांची नावे संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांना कळवावीत, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

‘अनधिकृत गैरहजेरी’ मानली जाणार

त्यानुसार कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय रजेवर जाऊ नये. पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणे किंवा रजा मंजूर नसताना गैरहजर राहणे ही बाब ‘अनधिकृत गैरहजेरी’ मानली जाईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती