महाराष्ट्र

परराज्यातून आणलेल्या वाळूची नोंदणी बंधनकारक; राज्य सरकारचा निर्णय

बेकायदा वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : बेकायदा वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. परराज्यातून आणलेल्या वाळूची नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून याबाबत शासन निर्णय नुकताच जारी केला आहे.

राज्यात वाळूची मागणी पूर्ण करण्यासाठी इतर राज्यातून वाळू वाहतूक केली जाते. परराज्यातील वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे वैध वाहतूक पास असल्यास राज्यात वाळू आणण्यास कोणत्याही प्रकारे प्रतिबंध करण्यात येऊ नये, अशा सूचना शासनाच्यावतीने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व वाहतुकीबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. परराज्यातून वाळू वाहतूक करण्यासाठी संबधित व्यक्ती किंवा संस्थेला गौण खनिजच्या उत्खनन, वाहतुकीबाबत नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यात वाहनाचा तपशील, वाहनाचा प्रकार व त्याची क्षमता आदी माहिती द्यावी लागणार आहे. राज्याच्या प्रशासनाने मान्यता दिलेल्यांनाच परवाना मिळणार आहे. इतर राज्यातून वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची राज्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारून तपासणी केली जाणार आहे. तसेच परराज्यातील वाळूचा साठा करून विक्री केली जाणार असले तर व्यापारी परवाना घ्यावा लागणार आहे.

स्वदेशी, स्वावलंबनाला आता पर्याय नाही - भागवत; देशाची सुरक्षा क्षमता वाढवण्याचा सल्ला

मराठी माणसात फूट पडू देणार नाही - उद्धव ठाकरे; मनसेसोबतच्या युतीचा पुनरुच्चार

पाकिस्तानला हलक्यात घेणे कितपत फायद्याचे?

सोनम आणि सरकार

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य