एसटी भाडेवाढ अखेर रद्द; पूरपरिस्थितीमुळे सरकारचा निर्णय; प्रवाशांना दिलासा 
महाराष्ट्र

एसटी भाडेवाढ अखेर रद्द; पूरपरिस्थितीमुळे सरकारचा निर्णय; प्रवाशांना दिलासा

राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेऊन अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दिवाळी सणासाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. सध्या खासगी वाहने वाढली असली तरीही एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. अनेक प्रवासी एसटीनेच प्रवास करतात.

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

दिवाळीत एसटीच्या तिकिट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. मात्र ऐन दिवाळीत एसटीच्या प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागू नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन मंत्र्यांना भाडेवाढ रद्द करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटीची १० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल