(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

‘त्या’ व्हायरल क्लिपप्रकरणी रोहित पवारांची चौकशी; भाजप आमदार आक्रमक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपविण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या योगेश सावंत नामक व्यक्तीला सोडविण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केला होता, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपविण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या योगेश सावंत नामक व्यक्तीला सोडविण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केला होता, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला. राम कदम तसेच आशिष शेलार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची विधानसभेत मागणी केली. भाजप आमदारांच्या मागणीनंतर विधानसभेत तालिका अध्यक्षांनी राज्य सरकारला चौकशीचे निर्देश दिले. तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिलेल्या निर्देशानंतर सखोल चौकशी करण्याचे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

राम कदम यांनी हा विषय उपस्थित करताना सांगितले की, “सांताक्रुझ पोलीस ठाण्यात अजय पनवेलकर यांनी व्हायरल होणाऱ्या क्लिपबददल तक्रार नोंदविली आहे. या व्हायरल क्लिपमध्ये महाराष्ट्रात जातीवाद कसा पसरेल, याचे षड‌्यंत्र आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला मातीत गाडू असे यातील व्यक्ती म्हणते. कोण आहे हा इसम? फडणवीस यांचा उल्लेख करत घाणेरड्या शिव्या देतो आहे. तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राम्हण संपवून टाकू, असे ही व्यक्ती म्हणते. योगेश सावंत असे या व्यक्तीचे नाव आहे. याचे संबंध बारामतीशी आहेत.”

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार

शिवसेना नाव, चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश

विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नसल्याचा लगेच निष्कर्ष काढू नका! AAIB अहवालावर एअर इंडियाच्या ‘सीईओं’चे विधान