खिशाला कात्री! केस कापण्यापासून दाढीपर्यंत सर्व महागले; नवे दर जाणून घ्या 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

खिशाला कात्री! केस कापण्यापासून दाढीपर्यंत सर्व महागले; नवे दर जाणून घ्या

महाराष्ट्रात केस कापणे, दाढी करणे आणि इतर सलून सेवांसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नाभिक समाजाने राज्यभरातील सलूनच्या दरांत २० टक्क्यांची वाढ लागू केली असून नवीन दर तत्काळ प्रभावाने लागू झाले आहेत.

Mayuri Gawade

सलूनमध्ये केस कापणे किंवा दाढी करणे आता महाराष्ट्रातील नागरिकांच्या खिशाला अधिक महाग पडणार आहे. राज्यातील नाभिक समाजाने विविध सेवांच्या दरांत २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून नवीन दर शनिवारपासून (दि. ६) लागू झाले आहेत.

या निर्णयाचा परिणाम राज्यातील एक लाखांहून अधिक सलून आणि नाभिक दुकानांमधील ग्राहकांवर होणार आहे.

आता किती मोजावे लागणार?

नवीन दरांनुसार सामान्य हेअरकटसाठी १८० रुपये मोजावे लागतील. दाढीसाठी १२० रुपये, तर दाढी ट्रिमिंगसाठी १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

याशिवाय डोक्याच्या मसाजसाठी १८० रुपये आणि केस धुण्यासाठी १२० रुपये द्यावे लागतील. फेशियलसारख्या सेवांचे दर ७०० रुपयांपासून, तर हेअर स्पासाठी ६०० रुपयांपासून सुरू होणार आहेत.

दरवाढीमागे काय कारण?

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलूनमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू, सौंदर्यप्रसाधने आणि इतर साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे व्यवसायाचा खर्च सातत्याने वाढत असल्याने दरवाढ अपरिहार्य ठरली.

महामंडळाचे पदाधिकारी श्याम आसकरकर यांनी सांगितले की, साधारणपणे दर दोन वर्षांनी जानेवारी महिन्यात दरांचा आढावा घेतला जातो. मात्र यावेळी सलूनमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे नियोजित वेळेआधीच दरवाढ करावी लागली.

कोणत्या सलूनना लागू?

महामंडळाने स्पष्ट केले आहे की, हे दर प्रामुख्याने परिसरातील सामान्य नाभिक दुकाने आणि सलूनसाठी लागू आहेत. प्रीमियम सलूनमध्ये आधीपासूनच यापेक्षा जास्त शुल्क आकारले जाते. अनेक उच्चभ्रू सलूनमध्ये केवळ हेअरकटसाठीच ५०० रुपयांपासून शुल्क आकारले जाते.

या दरवाढीमुळे आता नियमित सलून सेवांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड