प्रातिनिधिक छायाचित्र 
महाराष्ट्र

बारावीच्या निकालाची प्रत आज मिळणार; पुरवणी परीक्षा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता. आज (दि.१६) विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार...

Swapnil S

पुणे : राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र, तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधित विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना १६ मे रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे.

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्याचे निर्देश राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २४ मेपर्यंत, तर विलंब शुल्कासह २९ मेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून शुक्रवारी (दि. १६) दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू

पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधारण्यास इच्छुक विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विद्यार्थी यांना अर्ज भरता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येईल. श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना जून-जुलै २०२५,फेब्रुवारी -मार्च २०२६, जून-जुलै २०२६ अशा तीन लगतच्या संधी उपलब्ध राहतील. नियमित आणि विलंब शुल्काने अर्ज भरण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस