महाराष्ट्र

सहा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र इसिस मॉड्यूल प्रकरण; देशविरोधी अजेंड्यासाठी तरुणांना भडकावण्याचा कट

जागतिक पातळीवर दहशतवादी कारवायांसाठी सक्रिय असलेली संघटना इसिसमध्ये भरती

Swapnil S

मुंबई : राज्यात जुलैमध्ये पर्दाफाश करण्यात आलेल्या इसिस मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सहा मुख्य आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयात ४०० पानी आरोपपत्र दाखल केले. आरोपी इसिसचा देशविरोधी हिंसक अजेंडा पुढे नेण्यासाठी तरुणांची माथी भडकावण्याचा प्रयत्न करत होते, असा दावा एनआयएने केला आहे.

देशात दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी इसिसने रचलेल्या कट-कारस्थानांचा गौप्यस्फोट एनआयएने आरोपपत्रात केला आहे. विशेष सत्र न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या न्यायालयात एनआयएने आरोपपत्र दाखल केले असून त्यात १६ संरक्षित साक्षीदारांची नावे आहेत.

जागतिक पातळीवर दहशतवादी कारवायांसाठी सक्रिय असलेली संघटना इसिसमध्ये भरती तसेच या संघटनेला पैसा पुरवण्यासाठी सहा आरोपींनी सहभाग घेतल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. झुल्फिकार अली बडोदावाला व आकीफ अतिक नाचन या दोघांविरुद्ध यापूर्वी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आयईडी बनवल्याबद्दल पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ताबिश आणि झुल्फिकार या दोन आरोपींनी इसिसच्या स्वयंभू खलिफाशी शपथ घेतली होती, असाही खुलासा एनआयएने आरोपपत्रात केला आहे.

यांच्याविरुद्ध आरोपपत्र

जुलै महिन्यामध्ये विविध भागातून एनआयएने अटक केलेल्या ताबीश नासेर सिद्दीकी, झुल्फिकार अली बडोदावाला ऊर्फ लालाभाई, शर्जील शेख, बोरिवली-पडघा येथील आकीफ अतिक नाचन, जुबेर नूर मोहम्मद शेख ऊर्फ अबू नुसैबा आणि पुण्यातील डॉ. अदनानली सरकार या सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

प्रमुख मुद्दे

टेरर मॉड्युल प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनी इसिसच्या इशाऱ्यावरून लोकांमध्ये दहशत पसरवण्याबरोबरच देशाची धर्मनिरपेक्ष, आचारसंहिता, संस्कृती आणि लोकशाहीला धोका निर्माण करण्याचा कट रचला होता.

एनआयएने आरोपींच्या घरांमधील झडतीत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, इसिसशी संबंधित दस्तावेज व इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. त्याचबरोबर अनेक भडकाऊ सोशल मीडिया पोस्टदेखील जप्त केल्या आहेत.

जप्त केलेल्या साहित्यातून आरोपींचे इसिसशी असलेले मजबूत व सक्रिय संबंध तसेच दहशतवादी संघटनेचा देशविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न उघड झाले आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी