गुंतवणूक, आर्थिक विकासाला चालना मिळण्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास; जमिनीचा ‘सर्च रिपोर्ट’ एका क्लिकवर  (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

गुंतवणूक, आर्थिक विकासाला चालना मिळण्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास; जमिनीचा ‘सर्च रिपोर्ट’ एका क्लिकवर

महाभूमी स्टॅक प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनीच्या मालकीहक्काबाबत एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार असल्याने राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : महाभूमी स्टॅक प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनीच्या मालकीहक्काबाबत एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार असल्याने राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला.

महसूल आणि वन विभागाकडून विकसित करण्यात आलेली भूमी प्रशासनासाठीची महाभूमी स्टॅक प्रणालीचा मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रारंभ करण्यात आला. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी याविषयी सादरीकरण केले. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्याच्या महसूल आणि जमीनविषयक सुधारणामधील हा अतिशय महत्वाचा टप्पा असल्याचे नमूद केले.

जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहारात आणि व्यवहारानंतर अनेक बाबतीत नागरिकांना महाभूलेख, महाभूनकाशा, आयडीआरएस यासारख्या विविध प्रणालींची मदत घ्यावी लागते. या सर्व विखुरलेल्या प्रणालीचे एकत्रीकरण करून दहा प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे फडणवीस म्हणाले.

महाभूमी स्टॅक प्रणाली अभिलेखांचे डिजिटल भांडार

  • साडेतीन कोटींहून अधिक अधिकार अभिलेख (७/१२ आणि ८-अ)

  • दीड कोटीहून अधिक भू-नकाशे आणि मिळकत पत्रिका

  • ४० कोटींहून अधिक ऐतिहासिक स्कॅन केलेले फेरफार आणि जुने अभिलेख

  • नोंदणी विभागाचे दस्त क्र.२ (इंडेक्स -२) च्या प्रती आणि महसूल न्यायालयीन प्रकरणांची अद्ययावत स्थिती

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाण्यात नळजोडण्यांवरील ५००० स्मार्ट मीटर चोरीला; गेल्या आठ वर्षांतील घटना, झोपडपट्टीत सर्वाधिक चोरी

Pune : कुकडी प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी रुपयांची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mira-Bhayandar : ५.१४ लाख मतदारांपैकी २.१३ लाख नोंदी बाद

दहशतवादाविरुद्ध लढ्याचे मोदींचे आवाहन; शांघाय सहकार्य संघटनेत पाकिस्तानवर जोरदार टीका

'सहा लाख' मतदार वगळले; २ लाख ७० हजार मतदारांचा 'पत्ता'च नसल्याचे उघड, निवडणूक विभागाचा दावा