महाराष्ट्र

सरकारी लॉटरी वाचविण्यासाठी विक्रेता संघटना शासनासोबत

शासन व सर्वसामान्य जनतेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन रम्मी जुगाराला आळा घालून, महाराष्ट्र राज्य लॉटरी पारदर्शकपणे चालवता येईल, ती बंद करण्याची गरज नाही. अनुभवी लॉटरी चालक, विक्रेते, त्यांच्या संघटना त्यासाठी राज्य शासनाला मदत करायला तयार आहेत, असे मराठवाडा लॉटरी विक्रेता, चालक संघटनेचे अध्यक्ष गणेश म्हैसमाळे यांनी सांगितले.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : शासन व सर्वसामान्य जनतेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन रम्मी जुगाराला आळा घालून, महाराष्ट्र राज्य लॉटरी पारदर्शकपणे चालवता येईल, ती बंद करण्याची गरज नाही. अनुभवी लॉटरी चालक, विक्रेते, त्यांच्या संघटना त्यासाठी राज्य शासनाला मदत करायला तयार आहेत, असे मराठवाडा लॉटरी विक्रेता, चालक संघटनेचे अध्यक्ष गणेश म्हैसमाळे यांनी सांगितले.

सोशल मीडिया, टीव्ही अशा माध्यमातून ऑनलाइन रम्मी व काही जुगारांच्या जाहिरातींचा मारा सतत होत असतो. आमिषाला बळी पडून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, काहींनी आत्महत्या केल्या. या पार्श्वभूमीवर म्हैसमाळे म्हणाले, गोवा, सिक्कीम, मिझोराम, नागालँड आदी राज्यांतील लॉटरी महाराष्ट्रात चालविण्यासाठी काही जणांना कंत्राटे दिल्याने महाराष्ट्र राज्य लॉटरी कमकुवत झाली. महाराष्ट्र राज्य लॉटरी वाचवण्यासाठी, ती पारदर्शक, प्रामाणिकपणे चालविण्यासाठी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक

समिती नुकतीच केरळ राज्याचा दौरा करून आली. या समितीने आमची अनुभवी मते विचारात घेतली, तर राज्य सरकारचा फायदाच होईल, असे ते बोलत होते.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली